काल रविवार होता.. गेले ४/५ दिवसांपासुन मी १८ तारखेला असलेल्या पुस्तक प्रकाशनासंदर्भात फ्लायर किवा व्हीडीओ शेअर करत आहे.. त्यामधे १८ तारीख दुपारी २ वाजता पत्रकार भवन असा स्पष्ट उल्लेख आहे तरीही काल माझे एक वाचक पत्रकार भवन येथे गेले आणि त्यांनी तिथुन मला फोन केला आणि म्हणाले , सोनल मॅम मी इथे आलोय , पण इथे कोणीच दिसत नाही .. तुम्ही कुठे आहात ??.. मी त्यांना म्हटलं , इथे म्हणजे कुठे आणि मी माझ्या घरी आहे..
अहो आज रविवारी तुमचा कार्यक्रम आहे असं तुमच्या व्हीडीओमधे ऐकले होते ..
मला त्यावर काय बोलावं काहीही सुचेना.. मी त्यांना विचारलं , तुम्ही नीट व्हीडीओ ऐकला असता तर बरं झालं असतं कारण कार्यक्रम पुढच्या रविवारी आहे.. हे ऐकल्यावर त्या व्यक्तीची रास काय असेल याचा अंदाज आला.. आवाजावरुन ते मिडल एज वाटले.. त्यांना म्हटलं , तुमची कन्या रास आहे का ??.. त्यावर तेही न ऐकता ते म्हणाले , मला तुमच्यासोबत सेल्फी हवाय त्यादिवशी द्याल ना ??.. मी पुन्हा एकदा कुतूहलाने राशीचा विषय काढल्यावर हो मॅडम मी आणि बायको दोघेही कन्या राशीचे आहोत असं म्हटल्यावर , मी त्यांना म्हटलं , हे बरं झालं .. म्हणजे कोणालाच कोणाचं ऐकायला नको.. दोघेही बडबड करत रहा..
मुळात या राशीच्या लोकांकडे समोरच्याचं ऐकण्याची क्षमताच नसते.. फक्त आपलच घोडं पुढे दामटवायचं आणि काहीही सांगायला गेलं की राग प्रचंड .. यांच्या मुलांची रास काय असेल असा केविलवाणा प्रश्न माझ्या मनात डोकावून गेला .. कमी बोलावं आणि जास्त ऐकावं हे कन्या राशीला जमलं तर यासारखी दुसरी रास नाही.. सगळं उत्तम असुन इथे माती खातात आणि विशेष म्हणजे त्यांना त्याबद्दल काहीही वाटत नाही..
सोनल गोडबोले