कंधार : प्रतिनिधी
कंधार नगरपालिकेला गेल्या अनेक दिवसापासून कायमस्वरुपी मुख्याधिकारी नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. कंधार शहराचा पदभार तहसिलदार यांच्याकडे देण्यात आला आहे. मात्र ते दररोज नगरपालिकेला वेळ देत नाहीत. त्या अभावी नागरिकांची अनेक कामे खोळंबली आहेत. तात्काळ कंधार शहरातील नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी कंधार नगरपालीकेला कायमस्वरुपी मुख्याधिकारी देण्यात यावे असे मागणी शिवसेना शिंदे गटाचे पिंटू भगवानराव कदम तालुकाप्रमुख शिवसेना (एस. सी. एस. टी. ओबीसी) मागासवर्गीय विभाग, कंधार यांनी तहसिलदार गोरे यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे केली आहे.
नागरिकांना जन्म नोंदणी प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, मुलभूत सुविधा पाण्याचा प्रश्न, साफसफाई, दिवाबत्ती या सारख्या सुविधा वेळेवर मिळत नाहीत.
त्यामुळे शहरातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी कंधार शहरातील नगरपालिकेला कायमस्वरुपी मुख्याधिकारी देवून नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी असे निवेदनात नमूद केले आहे.