कंधार : मनकर्णिका नदी काठावर वसलेली क्रांतिनगरी बहाद्दरपूरा ,ता.कंधार या भूमीत एक आगळे-वेगळे रसायन आहे.मानवी जीवनावर एका महा भयंकर कारोना विषाणूमुळे एक विघ्न आले होते.त्याकाळात रक्ताचे नाते सुध्दा सोशल डिस्टन्स ठेवून वागत होता.त्या वेळेस जंगमवाडी,ता.कंधार पाटी जवळ एक महिला तापाने विव्हळत होती.
त्याची कल्पना श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार या संस्थेचे अध्यक्ष मा. प्रा.डाॅ.भाई पुरुषोत्तम केशवरावजी धोंडगे यांच्या संकल्पनेतून कंधार ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालय नांदेड येथे संपर्क केला.पण डॉक्टर उपलब्ध होवू शकले नाहीत. त्याचे कारण पीपीई किट अन् N-19 मास्क उपलब्ध नसल्यामुळे डाॅक्टर येऊ शकले नाहीत.म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारच्या वतीने संस्था सचिव माजी आमदार मा. भाई गुरुनाथरावजी कुरुडे साहेब यांचे अध्यक्षतेखालील कार्यक्रमात कंधार व लोहा तालुक्यातील सर्व डाॅक्टर्स बंधूंना मोफत वाटप करुन ती तत्कालीन गरज पूर्ण केली.लोकशाही व जय महाराष्ट्र न्यूज चॅनलने सामाजिक कार्याची दखल घेत पुरस्कार देऊन गौरव केला. १ मे २०२२ रोजी कामगार दिन व महाराष्ट्र दिनी ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी,माजी खासदार व आमदार डॉ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या शतकोत्सवी वर्षानिमित्त “भाऊचा डबा”हा सामाजिक बांधिलकीतून मानवता धर्म जपणरा उपक्रम सुरु केला.हा उपक्रम पाहता-पाहता १००० दिवसाचा टप्पा दि १३ फेब्रुवारी २०२४ रोजी पूर्ण केला.या सत्कार समारंभाची माजी प्राचार्य डाॅ.सुभाषरावजी नागपूर्णे सरांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झाली.संस्थेच्या परंपरे नुसार वंदेमातरम राष्ट्रीय गीत गायल्यानंतर ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करुन भाऊचा डबा नाबाद १००० दिवसाच्या औचित्यानेच श्री शिवाजी हायस्कूल हु.माणिकराव काळे रोड कंधार या ज्ञानालयाच्या वतीने भव्य ह्रदय सत्कार केला.
या सत्कार प्रसंगी गुलाब पुष्पाचा मोठा हार,शाॅल आणि हरहुन्नरी कलावंत, श्री शिवाजी हायस्कूलचे ग्रंथपाल दत्तात्रय एमेकर गुरुजी यांच्या सृजनशील कल्पकतेने मन्याड खोरी अनोखी ट्राॅफी स्टीलचा एक नंबर आकाडा आणि त्यावर तीन शून्य म्हणजे तीन टिफीन डबे वापरुन हा हजार दिवसाचा सांकेतिक अंक कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य डाॅ.सुभाषरावजी नागपूर्णे सर आणि मुख्याध्यापक सदाशिवराव आंबटवाड सर यांचे समर्थ हस्ते प्रदान करण्यात आला.श्री शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय (उर्दू ज्युनियर विभाग )प्रमुख प्रा.हिदायत बेग सर,प्रा.अफसर सर, प्रा.जमील सर,प्रा.रहिनुसा बाजी,
श्री शिवाजी विद्यालय बारुळचे मुख्याध्यापक अनिल वट्टमवार सर ,श्री शिवाजी विद्या मंदिर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक हरिभाऊ चिवडे सर आणि श्री शिवाजी प्राथमिक शाळा बारुळचे मुख्याध्यापक संघपाल वाघमारे यांनी सुमनांच्या हारांनी यथोचित सत्कार केला.या अविस्मरणीय क्षणा प्रसंगी कंधार शहरातील लेखनी बहाद्दर पत्रकार मित्र अँड दिगंबरराव गायकवाड सर,मारोतराव चिलपिंपरे सर,विपुलजी बोमनाळीकर,मुरलीधरजी थोटे सर,संपादक माधवराव भालेराव, मोहम्मद सिकंदर भाई,प्रा.सुभाषराव वाघमारे सर,माझा शिषोत्तम संघपाल वाघमारे,आणि हायस्कूलचे सर्व गुरुजन विद्यार्थी उपस्थित होते.प्रास्ताविक मुख्याध्यापक आंबटवाड सर यांनी केले.इयत्ता आठवी सेमी अ वर्गाची चिमुकली कु.प्रतिक्षा संग्राम मुसळे हीने आपल्या लाडीवाळ शब्दातून मा. प्रा.डाॅ.भाई पुरुषोत्तमराव धोंडगे साहेब यांच्या सामाजिक बांधिलकीचा आलेख सांगतांना उपस्थितीतांची मने जिंकली.प्रा.विद्याताई फड मॅडम यांनी साहित्यिक शैलीतून सामाजिक वाटचालीचा पाढा वाचत भविष्याच्या सदिच्छा दिल्या.सत्कारास उत्तर देतांना प्रा.डाॅ.भाई पुरुषोत्तम केशवराव धोंडगे साहेब यांचे भावनाप्रधान मनोगत व्यक्त करतांना उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या!त्यांना आपल्या बाबांच्या आठवणीने नेत्रांतील अश्रूंन वाट मोकळी करून देत आपले मनोगत पूर्ण केले.मी फक्त हार घेत आहे पण त्यामागे पूर्ण टिमची ताकद आहे.
मला माझ्या संस्थेची खुप मोठी ताकद आहे.म्हणून मला हिंमत येते.माझा श्वास असे पर्यंत भाऊचा डबा अखंडित सुरु राहणारच असे अभिवचन दिले.श्री शिवाजी हायस्कूलचा ९ व्या वर्गातील उत्कृष्ट बाल चित्रकार अन् रांगोळी कलावंत रमाकांत भीमराव जोंधळे यांने प्रा.डाॅ.भाई पुरुषोत्तम भाऊ यांचे उत्कृष्ट पेन्सिल स्केच रेखाटून पुरुषोत्तम भाऊचे अभिनंदन केले.तसेच हायस्कूलची गानकोकिळा वर्ग सातवीची कु पायल पांचाळ नागलगावकर या चिमुकलीच्या आवाजाने गुराखीपीठ वरील मान्यवर भारावून गेले.सोबत हायस्कूलचे संगीत विशारद गोविंदराव आन्नकाडे सरांचे तबला वादन दर्जेदार होते.अध्यक्षिय समारोप डाॅ.सुभाषराव नागपूर्णे सरांनी केले.या प्रसंगी पर्यवेक्षक आनंदराव पाटील भोसले सर मराठी ज्युनियर विभाग प्रमुख प्रा. संभाजी वडजे सर , सांस्कृतिक विभाग प्रमुख भास्कर आकुलवाड सर, अझर बेग सर,वैभव कुरुडे सर, सुरेश इरलवाड सर,बालाजी झुंजरवाड सर,ज्ञानोबा कुरे सर, माजी सर, प्रा मुरलीधर घोरबांड सर,प्रा.वाडीकर सर ,प्रा.जीके मोरे सर,प्रा.गजानन मोरे सर,आचार्य आर्य सर,
प्रा.पवार मॅडम,प्रा.उबाळे मॅडम,शेख ऐनोद्दीन सर,धोंडगे मॅडम,चिंतेवार मॅडम,देशपांडे मॅडम,नाईक मॅडम,मन्मथ पेठकर,सारीका कागणे सह प्राध्यापक,शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर बंधु भगीनी व विद्यार्थी उपस्थित होते.तर आभारप्रदर्शन उपमुख्याध्यापक अनिल जाधव यांनी मानले.उत्कृष्ट सुत्रसंचलन गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी केले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.