माळाकोळी; एकनाथ तिडके
कधी दुष्काळ…. कधी अतिवृष्टी…. शेतीमालाला भाव नाही यासह अन्य नैसर्गिक संकटे शेतकऱ्यांच्या “पाचवीलाच ” आहेत अशा अनेक संकटांना तोंड देत शेती करत असताना उत्पादन खर्चही निघणे कठीण बनत चालले आहे, मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाला… पिके जोमात आली…. यामुळे शेतकऱ्यांनी फवारणी ,खुरपणी , खते यासाठी मोठा खर्च केला ,
यावर्षी सुगी चांगली येईल असे वाटत असतानाच शेवटच्या टप्प्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे संपूर्ण पिके वाळून गेली.. .. सततचा दुष्काळ व अतिवृष्टी यासारख्या नैसर्गिक संकटांना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांची “साडेसाती ” संपण्याचे नाव घेत नाही.माळाकोळी पासून जवळच असलेल्या विठोबा तांडा येथील शेतकरी साहेबराव धेना राठोड व श्याम धेणा राठोड या दोन भावांनी दहा बॅग सोयाबीनची पेरणी केली होती संपूर्ण सोयाबीन पाऊस नसल्यामुळे वाळून गेले आहे, यामुळे सोयाबीन पेरणी साठी केलेला खर्चही निघण्याची शक्यता दिसत नाही.
विठोबा तांडा येथील शेतकरी साहेबराव राठोड व त्यांचे भाऊ श्याम राठोड हे प्रयोगशील व कष्टाळू शेतकरी म्हणून परिसरात परिचित आहेत, त्यांनी या वर्षी आपल्या नऊ एकर शेतीत दहा बॅग सोयाबीन पेरणी केली होती , मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे पिके जोमात आली यामुळे त्यांनी खुरपणी , फवारणी खते यासह शेतीमध्ये मोठा खर्च केला ,
मात्र शेवटच्या टप्प्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे संपूर्ण दहा बॅग सोयाबीन वाळून गेले आहे, 50 क्विंटल पेक्षाही जास्त उत्पन्न मिळण्याची शक्यता होती मात्र आता शेंगा भरल्याच नसल्यामुळे उत्पन्न 25% सुद्धा मिळण्याची शक्यता नाही,यामुळे त्यांनी शेतात केलेला खर्च निघणे कठीण बनले आहे, त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून असल्यामुळे सदर नुकसान फार मोठे असलेले चे ते सांगतात ,
पंधरा सदस्य असलेल्या कुटुंबाचा “गाडा ” ते शेतीच्या उत्पन्नावर चालवतात यामुळे यावर्षीच्या झालेल्या नुकसान यामुळे सदर कुटूंबीय मोठ्या अडचणींचा सामना करत असून विमा कंपनीने सदर नुकसान कडे लक्ष देऊन पंचनामा करण्याची आवश्यकता आहे.
————–
शेतकर्याची “साडेसाती” संपेना, पाऊस उघडल्यामुळे दहा बॅग सोयाबीन वाळले….पाऊस काळ चांगला असल्यामुळे या वर्षी शेतीत आम्ही मोठा खर्च केला होता मात्र पोळा सणा नंतर पाऊस उघडला व संपूर्ण दहा बॅग सोयाबीन वाळून गेले 15 सदस्य असलेले कुटुंबाचा गाडा चालवणे अवघड बनले आहे,
साहेबराव राठोड शेतकरी
=============================
दरवर्षी कष्ट करून आम्ही शेती पिकवतो व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो मात्र यावर्षी शेतीमध्ये खर्च केले पैसे सुद्धा निघण्याची शक्यता नाही, त्यामुळे यावर्षी डोक्यावर कर्ज वाढण्याची चिंता आहे.
शामराव राठोड शेतकरी
=======