नांदेड. (प्रतिनिधी)- शास्त्रीय संगीत ही या क्षेत्रातील साधक व रसिकांनी जीवापाड जपलेली कला आहे. संगीताच्या भवितव्याबद्दल शंका व्यक्त करणा-यांनी नांदेड येथील महोत्सवाचा अनुभव घेतल्यास त्यांच्या मनातील शंका दूर होईल. शास्त्रीय संगीत चिरंतन व चिरंजीवी असल्याचे प्रतिपादन खा.अशोकराव चव्हाण यांनी केले.
संगीत शंकर दरबारच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते संगीत शंकरदरबार संगीत संमेलनाचे उद्घाटन जेष्ठ गायिका अश्विनी भिडे देशपांडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले.या प्रसंगी खा.अशोकराव चव्हाणबोलत होते.
अविरत चालणा-या महोत्सवाला नांदेडकरांचा प्रतिसाद हीच प्रेरणा आहे.शंकरराव चव्हाण यांच्या ध्येयधोरणानुसार मार्गक्रमण करतांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात कांहीतरी करण्याच्या विचारातून हा महोत्सव साकारलेला आहे.असेही खा. चव्हाण यांनी स्पष्ट केले.
प्रारंभी स्वर्गीय शंकरराव चव्हाण व कुसूमताई चव्हाण यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर,आ.मोहन अण्णा हंबर्डे,माजी आ.अमरनाथ राजूरकर,आयुक्त डॉ.महेश डोईफोडे,माजी आ.अविनाश घाटे,गायक संजय जोशी यांची उपस्थिती होती,
प्रारंभी प्रास्ताविकात संजय जोशी यांनी महोत्सव संयोजना मागील पार्श्वभुमी सांगीतली. त्यानंतर २०१४ चा संगीत दरबार घ्या वतिने दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार नांदेडचे जेष्ठ गायक शाम गुंजकर यांना खा. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.शाल श्रीफळ,मानपत्र व २१हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.