नांदेड दि.२७(प्रतिनिधी)-संगीत शंकरदरबारच्या अंतिम सत्रातील पहिली मैफल ग्वाल्हेर घराण्याच्या उदयोन्मुख गायिका यशस्वी सरपोतदार यांची झाली.जेष्ठ गायिका पद्मा तळवलकर यांचे शिष्यत्व लाभलेल्या या गायिकेच्या गायनातील जोरकसपणे,सादरीकरणाची पद्धती जाणकारांना देखील प्रभावित करणारी होती.त्यांच्या गायनाला रसिकांनी भरभरून दाद दिली.
यशस्वीताईंनी सादर केलेला ‘भुप’ विलक्षण सुरेख आखीव-रेखीव स्वरूपाचा होता. सादरीकरण ‘प्रझेन्टेबल’ कसे असावे याचा जणू वास्तुपाठच होता.”जबसे तुम्ही संग लागली प्रित’ या तिनतालात तबला वादक रोहित मुजूमदार व हार्मोनियमवादक अभिषेक शिनकर यांच्या सोबतची जुगलबंदी टाळ्या मिळवून गेली.त्यानंतरचा तराना देखील त्याच ताकदीचा होता.
‘खमाज’ रागामध्ये प्रस्तुत केलेला
‘अब मान जावो सै़य्या…परु मैं तेरे पैंया..’ दादरा उपस्थितांना सुखावून गेला.
प्रारंभी सरपोतदार यांचे आतिथ्य विद्याताई शेंदारकर यांनी केले.कलावंतांचा परिचय व संचालन प्रा.विश्वाधर देशमुख यांनी केले.