आपल्या भारतीय संस्कृतीत अन्नाला अतिशय सन्मानाचे स्थान आहे, म्हणूनच अन्न वाया घालवणे किंवा फेकून देणे हे पाप मानले जाते. तथापि, अनेक ठिकाणी जसे कि काही कार्यक्रम, सोहळे यात अन्नाच्या नासाडीकडे दुर्लक्ष केले आहे.
हेच कारण आहे की नियमितपणे मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी होते. लग्नासारख्या प्रसंगी हे अधिक प्रमाणात आढळते.
विवाहसोहळ्यांमध्ये अन्नाची नासाडी आपण मुख्यतः आपल्या विवाहसोहळ्यांमध्ये किंवा उत्सवांमध्ये होणाऱ्या अन्नाची नासाडी जास्त होते. अशा कार्यक्रमात खूप अन्न कचर्यामध्ये जाते.अन्न वाया जाण्याचा परिणाम सध्याच्या काळात, अन्न वाया घालवणे म्हणजे जे अन्नासाठी प्राण गमावत आहेत.
आपल्या ताटात असेलेले सर्व अन्न आपण संपवले पाहिजे. बरेच लोक ताटात तसेच अन्न शिल्लक ठेवतात अशामुळे अन्नाची खूप नासाडी होते.आपल्याला आवश्यक तेवढेच अन्न घ्या आपण जेवढे खाणार आहे तेवढेच जेवण घ्या. आणि जेवण शिल्लक असेल तेर कोना भुकेलेल्या व्यक्तीला ते देऊन टाका.असे राहिलेले अन्न कचऱ्यात टाकण्यापेक्षा कोणाला दिलेले कधीही चांगलेच आहे.
आपल्या देशातच्या संस्कृती मध्ये या प्रमाणात अन्न वाया जात आहे हे अत्यंत धक्कादायक आहे. हे खूप निष्काळजीपणा आणि अन्नाचे महत्व असल्याची भावना नसणे आहे. आपण सर्व नागरिकांनी अन्न वाया घालवू नका अशी प्रतिज्ञा घेतली पाहिजे.समाजात एकमेकांच्या चांगल्या निर्धार आणि सहकार्याद्वारे हे शक्य होईल.
*सुनिल रामदासी*
पत्रकार
9423136441