मुखेड:
तालुक्यातील वर्ताळा येथील रहिवाशी तथा
जि. प. प्राथमिक शाळा चौकी (महाकाय) तालुका कंधार येथील उपक्रमशील शिक्षक बळवंत शेषेराव डावकरे यांचा ‘मौनातल्या वेदना’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून जागर मराठीचा या कार्यक्रमांतर्गत बुलढाणा येथे प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमास बुलढाणा बँकेचे संस्थापक अध्यक्ष श्री चांडक, ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र इंगळे, मराठी शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा राहुल पाटील, सविताताई ठाकरे, वैशाली अंडरस्कर, संग्राम कुमठेकर,विष्णु संकपाळ, तारका रुकमोडे, मुख्याध्यापक शिवाजी डावकरे, डॉ. कृष्णकांत डावकरे, सौ. सुषमा डावकरे, श्रीनिकेतन डावकरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. बळवंत डावकरे हे उपक्रमशील व विद्यार्थी प्रिय शिक्षक असून उत्कृष्ट सूत्रसंचालनकर्ता म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. त्यांच्या या पहिल्या काव्यसंग्रहास अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.