भारत हा विविधतेत एकता दाखवणारा देश आहे. येथे अनेक धर्माचे लोक एकत्र राहतात आणि प्रेमाने प्रत्येक सण साजरे करतात. आपण सर्वजण एकत्र येऊन सण उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतो आणि सर्वांमध्ये परस्पर प्रेम आणि आनंद वाटून घेतो. सर्व सण आपल्यासाठी खास असतात पण यापैकी काही आपले सण खुप आवडते असतात, जे सण आपल्याला सर्वात जास्त आवडतात ते सण आपण खूप एन्जॉय करतो.
मार्च मध्ये, आपण शिवरात्री, महिला दिन, होळी, रंगपंचमी, वसंत पौर्णिमा, रामनवमी इत्यादी काही प्रमुख सण साजरे करतो . मार्च महिनात पुर्णता: हिवाळा ऋतू संपतो आणि वसंत ऋतुचे मोठ्या उत्साहाने, आनंदाने स्वागत करण्यासाठी आपण सज्ज होतो.
अश्या या हंगामातील रंगांना आलिंगन देण्यासाठी आणि त्याची नवीन सुरुवात करण्यासाठी होळी साजरी केली जाते.
होळी आणि रंगपंचमी हा भारतातील सर्व प्रदेशांमध्ये मार्च महिन्यात साजरा केला जाणारा सर्वात उत्साही सण आहे यात शंका नाही. महिन्यातील इतर काही विशिष्ट पैकी हे ही सण खास आहेत. याचबरोबर वसंत ऋतू हा वर्षाचा सर्वोत्तम भाग आहे! निसर्गाची मुक्तता आणि वसंत ऋतू जागरण हे आपल्या निसर्ग चक्राचे प्रतीक आहे.
होळी हा हिंदूंचा प्रमुख सण आहे आणि आपण तो मोठ्या थाटामाटात साजरा करतो. होळी हा रंगांचा सण आहे, म्हणून त्याला रंगोत्सव असेही म्हणतात. हा सण फेब्रुवारी-मार्च महिन्यात येतो. हिंदू दिनदर्शिकेनुसार हा सण फाल्गुन महिन्यात साजरा केला जातो.
होळी नंतरच्या रंगपंचमी सणाला लोक पांढरे किंवा जुने कपडे घालून घराबाहेर पडतात आणि होळीच्या रंगांचा आनंद लुटतात. लोक एकत्र येतात आणि एकमेकांना रंग लावतात आणि होळीच्या शुभेच्छा देतात. काही ठिकाणी होळी खेळण्याची एक वेगळी शैली आहे, लोक फुलं, मा ती, पाणी वगैरे टाकून होळीचा सणही साजरा करतात. होळीच्या वेळी भांग पिण्याचीही परंपरा आहे. लहानांपासून थोर मोठ्यांपर्यंत होळीचा सण खूप आनंदाने खेळला जातो .
रूचिरा बेटकर, नांदेड.
9970774211