सावित्रीबाई फुले यांनी स्री शिक्षणाचा पाया रचला यामुळे महिलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या , यानंतरच्या काळात चुल-मुल यातुन बाहेर पडत अनेक महिलांनी शिक्षण घेऊन प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने यश मिळवले , जागतिक महिला दिन साजरा करत असताना मुळच्या माळाकोळी ता लोहा येथील व सध्या संभाजीनगर येथे शिक्षीका म्हणून कार्यरत असलेल्या कांचन चव्हाण यांच्या कार्याचा गौरव होणे आवश्यक आहे. त्या सामाजिक कार्यकर्त्या , सृजनशील कवयित्री आहेतच शिवाय उपक्रमशील शिक्षीका आहेत.
माळाकोळी सारख्या ग्रामीण भागात त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले वडिल शिक्षक असल्यामुळे त्यांना घरातुनच सामाजिक व साहित्य विषयक बाळकडू मिळाले, पुढे पुणे येथे व्यावसायिक शिक्षण व संभाजीनगर येथे पदवी शिक्षण पूर्ण केले त्यानंतर संभाजीनगर येथील वरद विद्या मंदीर या शाळेत शिक्षीका म्हणून त्या रुजु झाल्या, उपक्रमशील शिक्षीका म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. शिक्षकी पेशा व त्यात सामाजिक कामाची आवड यामुळे त्यांनी विविध सामाजिक कामात सहभाग वाढवला, ग्रामीण भागातील पार्श्वभूमी असल्याने त्यांनी समाजातील गरजु व दुर्लक्षित घटकांचे प्रश्न जाणुन घेऊन त्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. पुरग्रस्तांना अन्न वाटप, कोरोणा काळात गरजूंना मदत, हिवाळ्यात बेघर लोकांना चादर वाटप, शाळेतील गरजु विद्यार्थ्यांना मदत अशा सामाजिक कामात त्या नेहमीच अग्रेसर असतात,
कांचन चव्हाण या एकपात्री नाटकातील कलावंताप्रमाणे वेगवेगळ्या भुमीका एकट्यानेच पार पाडत असतात शिक्षीका, समाजसेविका याबरोबरच त्या एक लेखिका व सृजनशील कवयित्री आहेत. त्यांची दोन कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत “कृषिका” हा कविता संग्रह तर “कृता” हा चारोळी संग्रह प्रकाशित झाला आहे यातील कृता या चारोळी संग्रहास राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळाला आहे. याबरोबरच वेगवेगळ्या वृतपत्रातुन साप्ताहिकातुन समाजातील ज्वलंत विषयांवर लेखन प्रसिद्ध झाले आहे, या लेखनासाठी त्यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी आजपर्यंत “महिलांनी सक्षम व्हावे”, महिलेने स्वसंरक्षणाकडे आणि देशाच्या विकासाकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे,
वीर जवानांना सलाम, सावित्रीच्या लेकी आम्ही उंच भरारी घेऊ!, बंजारा समाज परिवर्तनेर आवश्यकता (बंजारा पुकार मासिकात प्रसिद्ध),रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता?, जीवसृष्टी जगण्यासाठी पाण्याचे जतन हाच पर्याय!,
महिला सुरक्षित आहेत का?, मोबाईल जीवनावश्यक वस्तू की समस्या?, प्रेम आपुलकीचे सुंदर गुंफण बंजारा संस्कृती,
कोरोना महामारी विषयी जनता जागरूक आहे का?,
मराठवाड्याचा पाणी फकीर बाबुराव केंद्रे!, तुमच्या पाल्याला तुमचा वेळ हवाय!, अहिल्याबाई होळकर ,नवीन वर्षात महिलांसाठी काय सुविधा आणि सुरक्षा हव्यात , बहिणीचे भावास पत्र या विषयावर लेखन प्रसिद्ध झाले आहे. या लेखनासाठी त्यांचा पोलीस उपअधिक्षक श्री लांजेवार, उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर, सकाळ वृतसमुह, दिव्य मराठी, महाराष्ट्र टाइम्स यांनी सन्मान केला आहे.
घर, शाळा ,सामाजिक कार्य, अशा विविध जबाबदारी पार पाडत असताना त्या कायम व्यस्त असतात , तरीही त्यांच्या पाल्याच्या उत्कृष्ट पालनासाठीही त्यांना पुरस्कार मिळाला आहे. अंगभूत गुण व उपेक्षितांप्रती असलेला कळवळा यामुळे त्यांना व्यस्तते बाबत तक्रार नसते.
कांचन चव्हाण यांनी शिक्षीका म्हणून शाळेत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवायला सुरुवात केली, अल्पावधितच त्या विद्यार्थ्यांच्या आवडत्या शिक्षीका झाल्या, नमो चषक स्पर्धेमध्ये त्यांच्या शाळेचा केंद्रात प्रथम क्रमांक आला , विशेष बाब म्हणजे समाजातील ज्वलंत विषयांवरच त्या विद्यार्थ्यांकडून प्रकल्प तयार करुन घेतात यामध्ये स्त्री भ्रूणहत्या, शेतकरी आत्महत्या, वृक्षारोपण, पाणी अडवा पाणी जिरवा अशा विषयांतुन विद्यार्थ्यांसोबत च पालकांचेही प्रबोधन करत असतात , विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवुन यश मिळवण्यासाठी प्रोत्साहन दिले. हिंदी विषयाच्या प्रभावी अध्यापन कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे व प्रसार माध्यमातून त्यांच्या मुलाखती प्रसारीत झाल्या आहेत.
कांचन चव्हाण यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक सामाजिक संस्था, शासकीय यंत्रणा, यांचेकडून त्यांना पुरस्कार मिळाले आहेत, पालकमंत्री, जेष्ठ साहित्यिक, पत्रकार, वरिष्ठ अधिकारी यांच्या हस्ते त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जागतिक महिला दिनानिमित्त कांचन चव्हाण यांच्या सारख्या धडपड्या सामाजिक कार्यकर्त्या ंना शुभेच्छा….