स्त्रीस्वातंत्र्य आणि रील्स..महिला दिन .. भाग 6

अजीतकुमार दामले यांनी हा विषय सुचवला आहे.. अजीतजी कृतज्ञता व्यक्त करते पण तुम्ही तर माझ्याच मर्मावरच बोट ठेवले राव.. आता सगळीच गडबड हौवुन बसली .. आता काय लिहावं .. मी नेहमी खरं बोलते त्यामुळे खरच खरं लिहावं लागणार..

एक दोन वर्षभरापुर्वी कोणीतरी मला म्हणालं होतं , सोनल मॅम तुम्ही रील्स करत नाही का ?? त्यावर मी त्याला उत्तम दिलं होतं की माझा वाचनाचा वेळ रील्स मधे मला वाया घालवायचा नाही .. त्यानंतर मी माझ्या एका मैत्रीणीला रील्स करताना पाहिले आणि वाटले ही काय सारखे गोल गोल फिरुन रील्स टाकते त्याचदरम्याने माझे एक चाहते मला म्हणाले , रील्स हा आधुनिक युगातील खुप मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि त्यातुन प्रत्येकाला त्याच्या कलागुणांना वाव मिळणार आहे त्यातुन तुमची फक्त कलाच नाही तर व्यवसाय वाढवायलाही मदत होइल.. हा शब्द ऐकल्यावर मी विचार केला की वाचन लिखाण करता करता आणि माझे छंद जोपासताना मला पुस्तकाचे मार्केटिंग पण करता येइल..

 

माझ्याकडे भगवंताने अनेक कला दिल्या आहेत त्याचा या प्लॅटफॉर्मवर उपयोग करुन घेता येइल.. असा सुंदर विचार करुन मी खरं तर रील्सकडे वळले आणि त्यामुळेच अनेक वाचक जवळही आले.. सोशल मिडीयाचा उपयोग मी माझ्या व्यवसायासाठी करु लागले आणि त्यातूनच मुरडायलाही मिळतच की..
माझ्यासारख्या अनेक स्त्रीया कपडे , दागिने किवा अनेक बिझनेससाठी याचा उपयोग करु लागल्या.. पण काहीनी यातले धोके न ओळखता किवा आपल्या मौल्यवान वेळेचा विचार न करता फक्त भटकणं आणि रील्स करुन शेअर करणं इतकच करायला सुरुवात केली..

 

त्यामुळे व्यायामाकडे आणि घराकडे दुर्लक्ष व्हायला लागले.. त्यावरुन सासू सुन यात वाद वाढले.. काही बोल्ड रील्स केल्यामुळे नवरा बायकोत वाद व्हायला सुरुवात झाली. ऱील्सच्या नादात मुलांकडे दुर्लक्ष व्हायला लागले.. त्यांच्या अभ्यास आणि करीअरकडे दुर्लक्ष व्हायला लागले.. आपण कुठल्या गोष्टीत वहावत जायचे हे सर्वस्वी आपल्याच हातात असते.. जेव्हा स्वातंत्र्य येतं तेव्हा स्वैराचार येतो पण त्याला दुर सारत आपण आपली प्रगती करुन घ्यायची असते आणि तेच बऱ्याच जणीना जमत नाही आणि मिळालेल्या संधीचा फायदा न करता फक्त आलेला दिवस पुढे ढकलणे हेच सुरु रहाते.. सेल्फी आणि रील्सच्या नादात अनेक ॲक्सीडंट होतात त्यामुळे जबाबदारीचे भान असणे आणि कुठल्याही गोष्टीत वाहुन न जाता किनाऱ्यावर रहाता यायला हवे..
मी म्हणेन नवनवीन गोष्टी आत्मसात करताना जुन्या गोष्टी सोडु नका.. जुन्या नव्याची सांगड घाला.. त्यातले फायदे, तोटे आणि धोके याचा अभ्यास आपल्या प्रत्येकीला असायलाच हवा..रील्स करुन काही मंडळी कोट्याधीश झाले आहेत मग यात वाईट काय ??.. प्रत्येकवेळी पैसाच महत्वाचा नाही तर आनंदही तितकाच महत्वाचा असतो.. पण स्त्रीयांनी आपला मान आपणच वाढवावा त्यासाठी घर सांभाळत असताना काहीना काही करावे.. संसारात बॅलंस असेल तर घडी विस्कटत नाही.

आता थांबते कारण लिहीता लिहीता आठवलं भगवद्गीता श्लोकवर एक रील करायचे आहे.. तुम्हाला सगळ्याना भगवंताचे नाव घ्यायला लावायची जबाबदारी भगवंताने माझ्यावर सोपवली आहे त्यामुळे रील शिवाय पर्याय नाही . पण आधी मी हरीनाम घेते आणि मगच तुम्हाला सांगते.. आधी मी माझे घर सांभाळते आणि मगच तुम्हाला सल्ला देते.
तुम्ही जेव्हा मला आणि माझ्या विचारांना फॉलो करता तेव्हा या सगळ्या गोष्टीचा बॅलंस सांभाळणे ही माझी जबाबदारी आहे.. संत तुकाराम महाराज म्हणाले आहेतच,
…. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले….

#SonalSachinGodbole
#Sonalcreations
#SexEducation
#Proudtobeatranswoman
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi

 

 

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *