असाही मानवतेला छेद! चक्क रस्त्यावरच केले अतिक्रमण, —————————————- महिला पुरुषासह गुरा – ढोरांना सोबत घेऊन नारनाळी ग्रामपंचायत पुढे बसले आमरण उपोषण!

 

 

कंधार : विश्वांभर बसवंते
तालुक्यातील नारनाळी गावातील काही व्यक्तीनी चक्क रस्त्यावरच अतिक्रमण करून, रस्ता अडवून मानवतेला छेद दिला आहे, या विरोधात महिला व नागरिकांना सदरच्या रस्त्यावरून ये-जा करण्यासाठी हकनाक त्रास होत असल्यामुळे सदरील रस्ता खुला करून द्यावा, या मागणीसाठी नारनाळी ग्रामपंचायतमध्ये गुरे, वासरे, लहान मुलांसह महीला व नागरिक आमरण उपोषणास बसले आहेत.

कंधार तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेले व मुखेड विधानसभा मतदारसंघात असलेले नारनाळी या गावातील अंतर्गत रस्त्यावरच गावातील काही लोकांनी अतिक्रमण केले असल्याने त्याचा नाहक त्रास ग्रामस्थांना होत असून, सदरील रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. या रस्त्यावरील अनाधिकृत करण्यात आलेले अतिक्रमण काढण्याबाबत अनेक वेळा प्रशासनाला निवेदन देऊनही सदरची समस्या प्रशासनाला दिसत नसल्याने निद्रीस्त असलेले प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना जागे करण्यासाठी लोकशाही मार्गाने आमरण उपोषणाचा अवलंब करण्यात आला आहे. असे उपोषण करते यांनी बोलून दाखवले आहे.
नारनाळी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक ओठा ते हनुमान मंदिर जाणाऱ्या रस्त्यावरील नळ योजनेची सार्वजनिक पाईपलाईन अडवून अडथळा निर्माण केला आहे, त्याचबरोबर नागरिकांना ये – जा करण्यासाठी हकनाक त्रास होत आहे, या रस्त्यावरील अतिक्रमण तात्काळ हटवून रस्ता मोकळा करावा, या मागणीसाठी दि.७ मार्च २०२४ रोज गुरुवार पासून आमरण उपोषणास बसले आहेत.
सदरील रस्त्यावर करण्यात आलेले अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करून द्यावा, या मागणीसाठी यापूर्वी प्रशासनाला दि.१२ फेब्रुवारी २०१९, दि.२० जानेवारी २०२०, दि.१० व २१ एप्रिल २०२३, दि. २ व १४ ऑगस्ट २०२३, दि. ५ सप्टेंबर २०२३ रोजी निवेदन देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन देऊन वरील अडवलेला महत्त्वाचा रस्ता सन २०१९ ते सन २०२३ पर्यंत केलेले पत्रव्यवहार त्या प्रत्येक पत्राच्या प्रत माननीय गटविकास अधिकारी साहेब, तहसीलदार साहेब व ग्रामपंचायत यांना देऊनही न्याय मिळाला नाही. पुन्हा अंतिम निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी
दि.७ मार्च २०२४ रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे महिला व गुरेढोरेसह उपोषणास बसल्याचे सांगितले.

 

हा रस्ता पुर्वीचा आहे पण त्यावर काही व्यक्तींनी अतिक्रमण केले आहे. याचा ३० ते ४० घरांना ये-जा करण्यासाठी त्रास होत असून १० ते १२ वेळेस ग्रामपंचायत स्तरावर सभा घेऊन चर्चा केली पण अद्याप याबाबत कोणताच मार्ग निघाला नाही.
भुजंग देव्हारे
सरपंच प्रतिनिधी नारनाळी.

 

या रस्त्यावर झालेले अतिक्रमण हे १० ते १२ वर्षांपूर्वीचे आहे. मी या ग्रामपंचायतीचा कार्यभार मे २०२३ पासून घेतला असून २०१८-१९ पासूनचे ग्रामपंचायत फेर आकारणी रजिस्टर माझ्या जवळ आहे.
ग्रामसेवक बारमळे
पी.एस.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *