कंधार (राजेश्वर कांबळे )
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात आपले भरीव योगदान देणाऱ्या संस्था व व्यक्तींना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार राज्य शासन देत असते. महाराष्ट्र शासनाने पुरस्कार दि.8मार्च 2024 रोजी जाहीर केले असून गोपाळचावडी जि.नांदेड येथील आर.जे.वाघमारे यांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामुळे विविध स्तरातून त्यांचे स्वागत केले जात आहे.
आर.जे.वाघमारे हे सामाजिक क्षेत्रात सतत कार्यरत असतात. समाजप्रबोधन, जनजागृती, समाजपयोगी उपक्रमात आपले योगदान देत असतात.याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार जाहीर केला आहे.त्यामुळे विविध क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.पुरस्कार जाहीर झाल्यामुळे त्यांचे श्री.शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा.डॉ. पुरूषोत्तम धोंडगे, उपाध्यक्ष माधवराव पेठकर , परमेश्वर बंडेवार ,डॉ. गंगाधर तोगरे, उद्योजक माधव डोंपले ,जनार्धन गुपिले, कँप्टन गुणवंतरॉय तोगरे ,माजी नगरसेविका बेबीताई गुपिले ,
विजयकुमार तोगरे ,सेवानिवृत्त मुख्याध्यापक मनोहर डाकरे ,सौ.शारदा तोगरे , प्रा.डॉ.राहुल वाघमारे ,सौ.किरण तोगरे ,पत्रकार राजेश्वर कांबळे, वैजनाथ गिरी, विश्वाभंर बसवंते, दिगंबर वाघमारे ,माजी पं.स.सदस्य रामभाऊ देवकांबळे ,शिवसेनेचे पंडीत देवकांबळे, विश्वनाथ वाघमारे ,शिवा वाघमारे ,लघुउद्योजक निभितरॉय तोगरे, आदीनी अभिनंदन केले आहे.आर.जे.वाघमारे यांच्यावर समाजमाध्यम,दूरध्वनी वरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.