कंधार(ॲड.उमर शेख)
राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. कंधार तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेमार्फत तीन लाखापर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना ३ टक्के व्याज सवलत देण्यात येते. या व्याज सवलत योजने अंतार्गत २०२३-२४ या वर्षात नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर व्याज सवलत देण्यात येणार आहे.अशी माहिती महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कंधार शाखा व्यवस्थापक संदीप शिरफुले यांनी माहिती दिली.
महाराष्ट्र ग्रामीण बँकेमार्फत शेतकऱ्यांसाठी व्याज सवलत योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण बँक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. तीन लाखापर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना ३ टक्के व्याज सवलत दिली जाते. या व्याज सवलत योजनेचा २०२३-२४ या वर्षात नियमित कर्जफेड शेतकऱ्यांच्या खात्यावर व्याज सवलतीचा लाभ मिळणार आहे.तसेच या अगोदर बँकेने २०२२- २३ या आर्थिक वर्षात राज्य शासनाकडून मिळणारे १ टक्का व्याज सवलती नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना येत्या ३१ मार्चपर्यंत केंद्र शासनाकडून मिळणारे ३ टक्के व्याज सवलती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांकडून पीक कर्जाची मुदतीत परतफेड व्याज सवलत मिळवण्यासाठी शेतकरी पीक कर्जाची मुदतीत परतफेड करत आहेत. त्यामुळे बँकांची वसुली वाढून आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्यास मदत होत आहे. बँकेने शेतकऱ्यांचे कर्ज नियमित करून घेण्यासाठी महाग्रामीण बळीराजा तारणहार योजना MBTY व महाग्रामीण किसान सन्मान योजना MKSY या योजनेंतर्गत पात्र शेतकरी अद्याप वंचित आहेत. तसेच या दोन्ही योजना ३१ मार्चनंतर बंद होणार आहेत. तरी सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपले पीककर्ज खाते नियमित करून घ्यावे, असे आवाहन बँकेचे कंधार शाखा व्यवस्थापक संदीप शिरफुले यांनी केले आहे.