खा. चव्हाण यांच्या प्रयत्नाने विकासाची गाडी सुसाट भोकर मतदार संघासाठी ८२ कोटी रुपयांच्या निधीचे वितरण

 

नांदेड दि.१४ काही दिवसांपूर्वीच भोकरच्या विकास कामांसाठी १६ करोड रुपयांचा निधी मंजूर करून घेतल्यानंतर आता पुन्हा भोकर,अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यातील गावांना ८२ कोटी रुपयांच्या निधी माजी मुख्यमंत्री,खा.अशोकराव चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाने मंजूर झाला आहे. विकासाच्या धडाक्याने मतदार संघात आनंदाचे वातावरण पसरले आहे. सदर विकास निधी मंजुरीच्या पत्राचे वितरण खा. चव्हाण यांच्या शिवाजीनगर येथील निवास्थानी मान्यवरांच्या हस्ते गुरुवार दि. १४ मार्च रोजी करण्यात आले आहे.

यावेळी भाऊराव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव तिडके, व्हाइस चेअरमन नरेंद्र चव्हाण, नांदेड कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख लहानकर, मनपाचे माजी सभापती किशोर स्वामी, माजी जि.प.अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, मुदखेडचे बाळासाहेब देशमुख बारडकर, भगवान दंडवे ( भोकर) आणि बालाजी गव्हाणे ( अर्धापूर) , लक्ष्मण पा. इंगोले, बळवंतराव पा. इंगोले, केशवराव इंगोले, मारोती किरकन, ज्ञानेश्वर राजेगोरे आदींची उपस्थिती होती. बंजारा समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेवालाल महाराज यांच्या भोकर येथील सामाजिक सभागृहाची मागणी बंजारा समाज बांधवानी माजी मुख्यमंत्री,खा.अशोकराव चव्हाण यांच्याकडे केली होती त्यावेळी दिलेल्या वचनाचीपूर्ती करण्यासाठी अशोकराव चव्हाण यांनी शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करीत श्री संत सेवालाल महाराज सामाजिक सभागृह बांधकामासाठी ७ कोटींचा निधी ,बालाजी मंदिर ते बोरगाव रस्ता सुधारणांसाठी ३ कोटी व नगरपरिषद इमारत उर्वरित बांधकामासाठी ६ कोटी असा भोकरच्या विकासासाठी १६ कोटींचा निधी मंजूर करून घेतला असल्याचे वृत्त ताजे असतानाच पुन्हा भोकर, अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यातील २२ गावांना पर्यटन स्थळे परिसर विकास,आमदार स्थानिक विकास कार्यक्रम, आणि पुनर्वसित गावांना नागरी सुविधा पुरविण्या संदर्भात मंजूर ८२ कोटी रुपयांचा निधी खा.चव्हाण यांच्या प्रयत्नाने मंजूर झाला आहे

. पर्यटन स्थळे परिसर विकास अंतर्गत भोकर येथील दत्तगड साठी १ कोटी रुपये, पाळज येथील गणपती मंदिर परिसराच्या विकासासाठी ३ कोटी आणि बारड येथील शितला देवी मंदिर परिसरसाठी ५० लाख आणि पाटनुर येथील अपारंपार देवस्थान परिसर विकासासाठी ५० लाख असा एकूण पाच कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. तसेच पुरामुळे बाधित झालेल्या १६ गावांना ७५ कोटी ६५ लाख रुपये तर आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत १३ गावांना १ कोटी ३१ लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. राज्य शासन स्तरावरून प्रशासकीय मान्यता मिळालेल्या विविध विकास कामांच्या निधी मंजुर झाला आहे. नांदेड व मराठवाड्यात खा. चव्हाण हेच विकासाची गॅरंटी अशी आपसूक प्रतिक्रिया नांदेडकरांतून व्यक्त होत आहे.

निधीचे पत्र वाटप केलेल्या गावांची नावे
भोकर, मुदखेड आणि अर्धापूर तालुक्यातील जवळा मुरहार,मालेगांव, भोकर शहरातील दत्तगड मंदिर परिसर सुधारणा व बंजारा समाज संरक्षण भिंत बांधकाम ),कामळज,धामदरी,रोहिपिंपळगांव,उमरी,खांबाळा, देळुब बु.,लहान (सभागृह कुंभार समाज ),बोरगांव सिता,बारड,देळूब खु.,खुजडा,कोंढा,दरेगांव,पाटणूर,चिलपिंपरी,खडकी,सरेगांव,शेलगांव,वासरी,सांगवी खु.,शंखतिर्थ,देगांव बु.,टाकळी,कामठा बु.,पाथरड हिस्सा,शेलगांव बु. आणि पाथरड रेल्वे स्टेशन आदि गावांच्या विकासासाठी निधी वाटप करण्यात येणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *