नीता पन्नाशीच्या उंबरठ्यावर असली तरीही प्रत्येक गोष्टीकडे पहाण्याची तिची सकारात्मक नजर हीच तिची ताकद आणि तिला २५ वीशीत ठेवायला तिने सकारात्मकतेने फ्लर्टींग या शब्दाकडे आणि त्या कृतीकडे पहाणे..
फक्त शोले मधेच नाण्याच्या दोन्ही बाजू सेम आहेत पण हा अपवाद सोडला तर प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात आणि दोन्हीही त्या त्या ठिकाणी योग्य असतात. फक्त आपण त्याचा काय अर्थ घेतो यावर त्या नाण्याची किमत ठरते तसच व्यक्तीचही , फ्लर्टींग करणारा काय पध्दतीने विचार करतो यापेक्षा मी काय पध्दतीने ते घेते हे महत्वाचे आणि त्यावर माझी मानसिक आणि शारीरिक कंडीशन अवलंबून असते..
नीताचही तेच.. २५ वीशीतील मुलगा जेव्हा तिच्यासोबत हेल्दी फ्लर्टींग करतो तेव्हा तिने ते एंजॉय करायला सुरुवात केली.. म्हणजेच काय तर , ” मॅम तुमची स्माईल खुप छान आहे.. मॅम तुम्ही खूपच तरुण दिसता काय करता सांगा ना.. तुम्हाला इतका मोठा मुलगा आहे असं वाटत नाही.. तुमचा डाएट सांगा.. व्यायाम काय करता ते सांगा.. या त्याच्या वाक्यानी ती आतून सुखावली. मेनोपॉज मुळे शरीराला येणारा ड्रायनेस कमी होवु लागला.. ती आतुन स्वतःला जास्त तरुण समजू लागली.. त्यामुळे चांगले हॉर्मोन्स सिक्रेट व्हायला लागले.. तिची चिडचिड कमी झाली.. तिची मासिकपाळी सुरळीत झाली.. आरशासमोर उभी राहुन ती कंबरेचा घेर तपासू लागली. थोडसं वाढलेल्या पोटावरची चरबी कमी करायला ती योगा करु लागली.. ग्राउंडवर पळायला जाऊ लागली.. आणि हे सगळं कोणामुळे त्या २५ शीतील तरुणामुळे ??अजिबात नाही .. मग त्याच्या फ्लर्टींगमुळे ??.. अजिबात नाही.. मग कशामुळे ??.. फक्त आणि फक्त तिच्या त्या मुलाच्या फ्लर्टींगकडे पहाण्याच्या सकारात्मकतेमुळे.. यात नुकसान मुलाचही नाही आणि नीताचही नाही.. फायदा मात्र नीताचा आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाचा झाला कारण गेल्या ८-१० महिन्यात घरात नीताची चिडचिड नाही ना आजारपण फक्त चेहऱ्यावर आनंद त्यामुळे सगळ्याचे हार्मोन्स प्रॉपर वे ने काम करु लागले.
हेल्दी फ्लर्टींग हे फक्त आणि फक्त शरीरापलिकडे असावं नाहीतर त्याचा रीव्हर्स इफेक्ट दिसतो.. शरीरसुखाला प्रेम समजून काही दिवसांत त्याची मजा संपली की पुन्हा दुसरीकडे वळणाऱ्या मंडळीना हा आनंद कधीच मिळू शकत नाही.. ते त्या दुष्ट चक्रात अडकले जातात आणि स्वतः दुखी होवून कुटुंबालाही त्यात होरपळवतात.. नैसर्गिक रेमीडीला विकृतीचं स्वरूप आलं की त्यातील पावित्र्यता संपते आणि सगळं जग तसच दिसायला लागतं.. उत्तम दिसायला हवं असेल तर आपल्याला उत्तम पहाता यायला हवं आणि त्यासाठी गरज आहे ती आपले विचार बदलण्याची.. आणि ही ताकद देतं अध्यात्म..
उत्तम विचारसरणीने उत्तम माणूस बनून निम्म्या वयातील मुलांच्या फ्लर्टींगचा आनंद घेउयात.
सोच बदलो.. सबकुछ बदलेगा..
#SonalSachinGodbole
#Sonalcreations
#SexEducation
#Proudtobeatranswoman
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi