कंधार; प्रतिनिधी-
कंधार तालुक्यातील मौजे कौठा येथे स्वातंत्र्यापासून पुल वजा बंधारा प्रलंबित होता, या पुल वजा बंधाऱ्यासाठी कौठा वासियांना तसेच स्थानिक शेतकऱ्यांना नाहक त्रास सोसावा लागत होता , मागील अनेक दशकं या पुलाचे काम प्रलंबित होते, अखेर २ कोटी ५४ लक्ष रुपये प्रशासकीय मान्यतेच्या पूल वजा बंधाऱ्याचे भूमिपूजन दि. 15 मार्च शुक्रवार रोजी लोहा-कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले,
यावेळी आमदार शामसुंदर शिंदे व सौ.आशाताई शिंदे यांनी जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून शेकापच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे तसेच जलसंधारण विभागाचे उपअभियंता उत्तम गायकवाड,अभियंता आकाश माळवे यांची प्रमुख उपस्थिती होती, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कौठा ग्रामपंचायतचे सरपंच शिवकुमार देशमुख, बोरगावचे सरपंच प्रतिनिधी पुंडलिक पाटील बोरगावकर, शेकापचे जिल्हाध्यक्ष बालाजी इसातकर, काटकळंबाचे चेअरमन संभाजी पानपट्टे,कंधारचे पोलीस निरीक्षक जाधव, चौकी महाकाय सरपंच हनुमंत कदम, तेलूरचे सरपंच राजू भंडारे उपस्थित होते,
यावेळी कौठा गावकऱ्यांच्या वतीने आमदार श्यामसुंदर शिंदे व शेकाप व महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांचा पुष्पहार, शाल, श्रीफळ देऊन भव्य सत्कार करण्यात आला, यावेळी बोलताना आमदार शिंदे म्हणाले की, कौठा सर्कलच्या सर्वांगीण विकासासाठी मी आजपर्यंत भरीव निधी उपलब्ध करून दिला असून यापुढेही कौठा सर्कलच्या मूलभूत विकासासाठी निधीची कदापी कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही यावेळी आमदार शिंदे यांनी दिली,
यावेळी लोहा-कंधार मतदारसंघातील सर्वच सर्कलच्या सर्वांगीण मूलभूत विकासासाठी मी या भागाचा आमदार म्हणून सदैव कटिबद्ध असल्याचेही यावेळी आमदार शिंदे यांनी बोलताना सांगितले, मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने २ कोटी ५४ लाख रुपये प्रशासकीय मान्यता असलेल्या कौठा येथील पूल वजा बंधाऱ्याचे काम दर्जेदार पद्धतीने व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी आमदार शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या, यावेळी संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य सचिन कुदळकर, ओमराजे शिंदे, प्रदीप हुंबाड,शेकापचे दक्षिण जिल्हाध्यक्ष गिरीश डिगोळे,श्याम कपाळे, गंगाधर चिखलीकर, प्रफुल येरावार, सचिन जाधव,संजय ढिकळे, दिगंबर गिरी महाराज, बसवेश्वर मडके, व्यंकटी आढाव सह गावकरी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. यावेळी पंचक्रोशीतील सर्व गावातील गावकरी मंडळी कडून आमदार श्यामसुंदर शिंदे यांचे अभिनंदन व कौतुक होते आहे.
कौठा गावातील महिलांनी अनेक दिवसांपूर्वी या पुलासाठी माझ्याकडे मागणी केली होती आणि या भागातील महिलांना किती नाहक त्रास सहन करावा लागतो आहे हे माझ्या निदर्शनास आणून दिलं असता मी लगेच त्या दिवशी आमदार साहेबांच्या माध्यमातून या कामासाठी सतत प्रयत्नशील राहून कौठा येथील पुल वजा बंधारा कामासाठी अनेक अडचणीतून मार्ग काढत अखेर आज पुल वजा बंधारा कामांचे भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली व या भागातील शेतकरी ,महिला व नागरिकांची अनेक वर्षापासूनची पुलाची गंभीर समस्या संपली याचा मनस्वी आनंद होतो.
*सौ. आशाताई शामसुंदर शिंदे* *शेकाप महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या