कंधार प्रतिनीधी –
अखंड हरिनाम सप्ताह व संगीत श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असून वाशिम शहरातील सुप्रसिद्ध भागवताचार्य सुनील महाराज ठाकरे सुकळीकर यांच्या मधुर व रसाळ वाणीतून भागवत कथा श्रवणाचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा कथेची सुरुवात दि.१४ मार्च वार गुरुवार रोजी सुरू झाली असून सांगता दि. २० मार्च वार बुधवार रोजी होणार आहे.भागवत कथा दररोज दु.१ ते ५ या वेळेत होणार आहे. या भागवत कथेस नवनाथ महाराज ,गणेश महाराज ,शिवा महाराज ,शंकर महाराज यांची संगीत साथ लाभणार आहे.
भगवंतांचे स्वरूप दर्शविण्याचे आणि भगवत तत्त्वाचा निर्देश करण्याचे काम भागवत करते. जी व्यक्ती भगवंताची होते तिलाही भागवत म्हणतात. श्रीमदभागवत हे संसारातील भय दुःखाचा समूळ नाश करणारे अमृत आहे. मन शुद्ध करणारे याच्यापेक्षा चांगले साधन नाही. भगवंत प्राप्तीसाठी परमात्मा संबंधातील श्रवण, मनन, चिंतन हेच प्रत्येक जीवासाठी कल्याणकारी असते.
संत साहित्य मानवासाठी प्रेरक असून श्रीमद भागवत कथेने मानवाला आत्मकल्याणाचा मार्ग दाखविला आहे. या मार्गावर चालून सर्वांनी आपले जीवन सत्कर्मी लावावे. भागवत कथा म्हणजे दु:ख समूळ नष्ट करणारे अमृत आहे .
या सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे आहे,पहाटे ४ ते ६ काकड आरती भजन,सकाळी ७ ते ९ ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी १० ते १२ गाथा भजन. दुपारी १ ते ५ भागवत कथा , ६ ते ७ हरिपाठ, रात्री ९ ते ११ हरि किर्तन,रात्री १२ ते ४ हरि जागर भजन.
अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ह.भ.प. भागवत महाराज महालिंगीकर, ह.भ.प. बंडा महाराज अलगरवाडीकर, ह.भ.प. पद्माकर महाराज अमरावतीकर , ह.भ.प.सतीश महाराज पंढरपुरकर ,ह.भ.प. ज्ञानोबा माऊली महाराज अरबुजवाडीकर ,ह.भ.प.
ज्ञानेश्वर महाराज पवार पंढरपूरकर, ह.भ.प. प्रसाद महाराज गडदे आळंदीकर, यांचे रात्री ९ ते ११ वाजता सुश्राव्य किर्तन होणार आहे तर ह.भ.प. वैराग्यमूर्ती प्रभाकर महाराज झोलकर ( नाना ) यांचे काल्याचे किर्तन दि. २१ मार्च वार गुरुवार रोजी १० ते १२ वाजता होणार असून नंतर महाप्रसादाचे वाटप होणार आहे.महाप्रसाचे अन्नदाते समस्त गावकरी मंडळी संगमवाडी,तरी सर्व भाविक भक्तांनी या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये कंधार तालुक्यातील पंचक्रोशीतील भजनी मंडळ उपस्थित राहणार आहेत.या अखंड हरिनाम सप्ताह व संगीत भागवत कथा श्रवणाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा अशी विनंती संगमवाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे.