अहमदपूर ( प्रतिनिधी )
गेली अनेक महिन्यापासून नागपूर रत्नागिरी महामार्गावरील टेंभुर्णी रोडवरील पुलाखाली एक अनोळखी आणि बेवारशी पुरुष अनेक फाटक्या तुटक्या कपड्यांचे गाठोडे जवळ घेऊन काहीतरी बडबडत राहायचे. त्यांना कोणी जेवायला भाकरी आणि कुणी पाण्याचे बाटल द्यायचे. ते खायचे आणि तिथेच हातवारे करत काहीतरी बोलत राहायचे. ते रस्त्याची साफसफाई करायचे मेन कापडाच्या पिशव्या काडीकचरा जमा करून ते जाळून टाकायचे. चार-पाच दिवसांपूर्वी मी त्यांना बोलण्याचा प्रयत्न केला ते ढोबळेवाडी निटूर एवढेच म्हणायचे.
चार-पाच दिवसांपूर्वी त्यांची सकाळी सकाळी बडबड ऐकू आली नाही. ते निपचित पडून होते. खात्री झाली की ते या पृथ्वीतलावरून निघून गेले आहेत. नगरपालिकेला कळविण्याचा प्रयत्न केला पण नगरपालिकेकडून कळाले की पोलीस स्टेशनला कळवावे लागेल. थोड्याशा प्रयत्नानंतर कॉन्स्टेबल राठोड आणि ठाणे अंमलदार माने साहेब यांचे मोबाईल नंबर मिळाले. आणि अंमलदार माने साहेबांनी श्री बाळू आरदवाड साहेब यांचे मोबाईल नंबर उपलब्ध करून दिले. बाळू आराधवाड साहेबांनी पुढील संपूर्ण यंत्रणा राबवली आणि त्या बेवारशी मृत व्यक्तीस सरकारी दवाखान्याच्य शव ग्रहात घेऊन गेले.
आज कळाले की त्या मृत व्यक्तीचे नातेवाईक आले होते आणि त्यांनी त्यांना ताब्यात घेतले.
छत्रपती शाहू राजे योगा ग्रुप ने केलेल्या प्रयत्नाला यश मिळाले. धन्यवाद पोलीस स्टेशन अहमदपूर !!
शब्दांकन : एन डी राठोड; संकलन : प्रा भगवान आमलापुरे