मॅम दोन दिवसांत तुमचं लिखाण आलं नाही .. तुम्ही लिहीलं नाही की मला पाठवलं नाही ??.. माझे अनेक वाचक रोज माझ्या लिखाणाची वाट पहात असतात.. लिहा ना असं लेखकाला म्हटलं की त्याला काही सुचेलच असं नाही . कधी कधी ८/८ दिवस काहीही सुचत नाही आणि रात्री २ वाजताही पटकन काहीतरी छान सुचतं.. हे सुचतं कसं हेही आम्हाला कळत नाही.. हे प्रसवतं तेव्हा ९ महिने ९ दिवस पूर्णही होत नाहीत.. २४ वर्षांचा एक वाचक म्हणतो , मला तुमच्या हृदयापेक्षा मेंदुत शिरायचय .. ही कल्पनाच मला आवडली..
हृदयावर प्रेम करण्यापेक्षा मेंदूवर प्रेम केलं तर कदाचित तो एकटाच नशीबवान असेल .. हृदयात किती असतील याची गॅरंटी मी सुध्दा देउ शकत नाही.. माझ्या मेंदूत शिरुन त्याला जाणून घ्यायचे आहे आणि मला मात्र त्याच्या हृदयाची धडधड आताच माझ्या मेंदूत जाणवायला लागली आहे.
कोणाचं काय डोकं चालेल माहीत नाही.. पण त्यातून माझा मेंदू पायासारखा चालायला लागतो. या मेंदूला लहानपणी बदाम मिळाले नाहीत पण सात्विक शब्द कायमच चघळायला मिळाले.. रात्री १ वाजता हेच शब्द छाताडावर येउन बसतात आणि मला काहीतरी खरडायला मदत करतात पण ते काहीतरी नसून एक सुंदर कलाकृती असते.. काल सकाळी गार्डन ला पाणी देतांना अकराव्या पुस्तकासाठी एक सुंदर विषय डोक्यात आला.. बरेच विषय हे गार्डनमधेच सुचतात हा आतापर्यंतचा माझा अनुभव आहे कदाचित निसर्गच हे सुचवत असेल..
बऱ्याच जणांची एक तक्रार कॉमन आहे आणि ती म्हणजे , तुम्ही गृपवर रहात नाही, रीप्ल्याय करत नाही .. एका गृपवर एका सखीने लिहीले होते की , तुमचे लिखाण पाठवायलाच फक्त तुम्ही गृपवर आहात का ??.. तिच्या त्या वाक्याची किव आली कारण त्या सखीचा विचार चुकीचा आहे.. उलट मी किवा अनेक लेखक वाचकांना सतत काहीना काही देत असतात .. त्यातलं त्यांनी चांगलं वेचुन स्वतःला घडवायचं असतं ..लाखो वाचकांना रीप्ल्याय देणं प्रॅक्टिकली कसं शक्य आहे ??.. कुठलाही गैरसमज न करता फक्त वेचत रहा आणि चांगले विचार शेअर पण करत रहा.. मीही अनेकांना वाचते म्हणुन बोलायला आणि लिहायला सुचतं..ही कोणा एकाची संपत्ती नाही तर ब्रह्मांडात पेरलेले शब्द आपण वेचतो आणि त्यातून सुंदर कलाकृती निर्माण करतो.. भगवद्गीता सुरुवातीपासुन शेवटपर्यंत व्यासदेवानी गणेशजीना सांगितली आणि त्यांनी ती तशीच लक्षात ठेवुन लिहीली..हे ज्ञान त्यांना भगवंताने दिले म्हणजेच शब्द कुठून आले विचार करा ना.. आपलं काहीच नाही फक्त जो योग्य वेचतो त्याचं ते कौशल्य असतं.. त्यामुळे माझ्यासारख्या कुठल्याही लेखकाला गर्व करायचा काहीही अधिकार नाही.. आपण निमित्त आहोत.. एका सुंदर पुस्तकाचे लिखाण सुरु आहे.. त्यामुळे तुम्ही मेंदूवरच प्रेम करा.. तिथेच काहीबाही शिजतय..
#SonalSachinGodbole
#Sonalcreations
#SexEducation
#Proudtobeatranswoman
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi