कंधार (संतोष कांबळे)
शिक्षक सेना सहविचार बैठक जिल्हा परिषद हायस्कूल मल्टीपर्पज नांदेड येथे दिनांक ९ मार्च रोजी बैठक संपन्न झाली. सदरील बैठकीत संघटनात्मक पातळीवर शिक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्याच्या निवडी घोषित करण्यात आल्या आहेत. यामध्ये श्री रविराज माधवराव जाधव यांची जिल्हा समन्वयक शिक्षक सेना नांदेड म्हणून तर श्रीमती सुकन्या खांडरे यांची जिल्हाध्यक्षा महिला आघाडी शिक्षक सेना नांदेड पदी पदी निवड करण्यात आली.
शिक्षकाचा प्रश्नावर सातत्याने लढणारी आक्रमक आणि अग्रेसर भूमिका असलेल्या शिक्षक सेनेची जिल्हा परिषद हायस्कूल मल्टीपर्पज नांदेड येथे शिक्षक सेना जिल्हास्तरीय सहविचार बैठक संपन्न झाली या बैठकीला शिक्षक सेनेच्या वतीने प्रमुख उपस्थिती म्हणून लातूर जिल्हासंपर्क प्रमूख तथा शिवसेना माजी आमदार मा श्री रोहिदास चव्हाण साहेब यांनी देखील भेट दिली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष श्री विठूभाऊ चव्हाण हे कार्यक्रमाचे अध्यक्ष, तर शिवसेना महानगर अध्यक्ष श्री पप्पु जाधव, श्री विठ्ठल देशटवाड मराठवाडा सहसचिव, श्रीरंग बिरादार मराठवाडा संघटक, जिल्हा अध्यक्ष श्री संतोष अंबुलगेकर सर, जिल्हा सरचिटणीस रविंद्र बंडेवार, जिल्हा कार्याध्यक्ष श्री मनोहर भंडेवार या प्रमुख पाहुण्याच्या उपस्थितीमध्ये नांदेड जिल्हा शिक्षक सेनची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
यामध्ये श्री रविराज माधवराव जाधव यांची जिल्हा समन्वयक शिक्षक सेना नांदेड, श्रीमती सुकन्या खांडरे जिल्हा अध्यक्षा महिला आघाडी शिक्षक सेना, श्रीमती शोभा गिरी जिल्हा कार्याध्यक्ष, श्रीमती पंचफुला वाघमारे जिल्हा उपाध्यक्ष, श्रीमती शिवकन्या पटवे जिल्हा सरचिटणीस महिला आघाडी नांदेड पदी निवड करण्यात आली.
शिक्षक सेना संघटना विषय शिक्षक, दर्जान्नोती, मुख्याध्यापक , केंद्रप्रमुख, अतिरिक्त समायोजन, वेळेवर पगार करणे, थकीत वेतन, मेडिकल बिल या प्रश्नांवर शिक्षक सेना कायम लढत आली आहे
जेथे शिक्षकांचे प्रश्न गंभीर
तेथे शिक्षक सेना खंबीर असते.
सोबतच कोषाध्याक्ष श्री गंगाधर कदम, जिल्हाउपाध्यक्ष श्री अविनाश चिद्रावार सर, श्री बालाजी भांगे सर, श्री गंगाधर ढवळे,जिल्हा उपाध्यक्ष मुस्तफा शेख, जिल्हा समन्वयक श्री अनिरुद्ध शिरसाळकर, जिल्हा संघटक श्री शिंदे डी डी सर, श्री प्रकाश कांबळे सर, श्री संजय मोरे सर, डीसीपीएस जिल्हा समन्वयक श्री गोविंद आलेटवार, शिक्षक नेते श्री शेख एम.ए माळाकोळी, गंगाधर राऊत सर, जिल्हा प्रसिद्धि प्रमुख तथा गुणवत्ता विभाग प्रमुख श्री संतोष किसवे पाटील, जिल्हा पदाधिकारी श्री शंकर हामंद सर, जिल्हा संघटक श्री पुंडलिक कारामुंगे, श्री शिवकुमार निलगिरवार,मल्टी पर्पज हायस्कुल नांदेड़चे मुख्याध्यापक श्री दाचावार सर, हिमायतनगर माजी तालुकाध्यक्ष तथा जिल्हा पदाधिकारी श्री आनंदा सुर्यवंशी सर, देगलुरचे पदाधिकारी श्री विजय अन्नमवार सर, श्री शिवराज गागीलगे सर, श्रीमती सीमा देशमुख, श्रीमती यमुना पवार,श्री मांजरमकर सर, श्री जाधव सर व श्रीमती स्वामी मॅडम, शंकर रोडेवाड हदगाव, श्री पत्की सर बेंबर, श्री सुवर्णकार सर, श्री पांचाळ सर देगलुर, श्री फिरंगवाडसर, श्री बंडु राठोड सर, श्री बनसोडेसर,
श्री संतोष घटकार सर, श्री चव्हाण सर, सर्व तालुक्यातील अध्यक्ष, यामध्ये बिलोली तालुकाध्यक्ष श्री बालाजीराव गेंदेवाड, लोहा तालुकाध्यक्ष श्री संभाजी पवार सर, किनवट तालुकाध्यक्ष श्री लोखंडे सर, नांदेड तालुकाध्यक्ष श्री प्रकाश फुलवरे सर, अर्धापुर तालुकाध्यक्ष श्री बस्वराज मठवाले सर, किनवट तालुका सरचिटणिस, श्री दत्ता फोले सर, श्री दत्ता पेंढारकर सर भोकर, लोहा तालुका संपर्क प्रमुख श्री लहु पंदलवाड सर, श्री याचावाड सर, श्री गोंडसर सोबतच कंधार, लोहा, मुखेड, भोकर, देगलूर, माहूर, किनवट, उमरी येथील शिक्षकाने या निवडीचे स्वागत केले आहे.