नांदेड – नांदेड तालुक्यातील ठाकरे गटाचे ज्येष्ठ शिवसैनिक तामाजी लुका प्रमुख जयवंत कदम यांनी राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे विकासात्मक धोरणासंदर्भात घेतलेले धडाडीचे निर्णय आणि त्यांच्याच माध्यमातून नांदेड उत्तरचे विकासरत्न, भाग्यविधातेआ.बालाजी कल्याणकर यांनी करत असलेल्या विकास कामांवर विश्वास ठेवून मतदार संघाचे विकास करण्यासाठी शिवसेना (शिंदे गट) प्रवेश करून पुन्हा एकदा घर वापसी केले आहे
तसेच शिवसेना प्रणित शेतकरी सेनेचे कार्याध्यक्ष प्रल्हाद इंगोले यांच्या नेतृत्वाखाली आ.बालाजी कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाने शिवसेनेचे ज्येष्ठ नेते काशिनाथ बोकारे यांची शिवसेना प्रणित शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख पदी निवड करून नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी शेतकरी सेनेचे कार्याध्यक्ष प्रल्हाद इंगोले, मंगेश कदम एसटी एससी ओबीसी मागासवर्गीय विभागाचे जिल्हाप्रमुख, गंगाधर बडूरे शिवसेना जिल्हाप्रमुख, दर्शनसिंग सिद्धू शिवसेना सह संपर्कप्रमुख नांदेड, राजू गुंडावार महानगरप्रमुख, संतोष मादनवाड शहरप्रमुख,
संतोष भारसावडे तालुकाप्रमुख, गणेश शिंदे शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख, देविदास सरोदे माजी सभापती, धनंजय पावडे उप तालुकाप्रमुख, नवनाथ काकडे विधानसभा संघटक, ओंकार सूर्यवंशी युवासेना तालुकाप्रमुख, धम्मा कदम, गणेश बोकारे, गब्बू बोकरे, वैजनाथ सूर्यवंशी सरपंच, मुन्ना राठोर, श्याम वानखेडे, मोहम्मद फय्याज, आदींसह मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची उपस्थिती होती.