कंधार | धोंडीबा मुंडे
कंधार शहरात भगवान बाबा मंदिराच्या कलशारोहणच्या कार्यक्रमाची शोभायात्रा दि.१७ मार्च रोजी सकाळी ठिक ९:३० वाजता बस स्टॉप ते शिवाजी महाराज चौक ते भगवानगड येथे समारोप झाला, शोभायात्रेत भगवान बाबा कि जय या जयघोषणात संपूर्ण कंधार शहर दुमदुमून गेले,महिलांच्या लक्षणीय उपस्थिती टाळ मृदंगाच्या गजरात
शोभायात्रेने कंधार वासियांचे लक्ष वेधून घेतले होते,
या कार्यक्रमांमध्ये भगवान बाबा मंदिराचे कलशारोहण व विठ्ठल रुक्मिणी आणि हनुमान मंदिराचा प्रतिष्ठापना कार्यक्रम संपन्न झाला,
या कार्यक्रमांचे प्रमुख मार्गदर्शक भगवानगडाचे महंत न्यायाचार्य नामदेव शास्त्री महाराज उपस्थित आफट जनसमुदाय मार्गदर्शन करताना
म्हणाले कि भगवान बाबाचे बीडनंतर महाराष्ट्रमध्ये एकमेव कंधार येथे मोठे मंदिर भव्य आहे,येथील मंदिरास भगवानगड सोडून भगवानगड संस्थान कंधार हे नाव द्या,वर्षातून भगवान गडावर येऊन कमीत कमी तीन ते चार दिवस चा सप्ताह करत जा असे उपस्थित वारकऱ्यांना निमंत्रित केले, महाराज म्हणाले,भीमसिंग महाराजांच्या काळात भगवान गडाची प्रॉपर्टी खूप गेली, अनेकांनी गडाची जमीन लाटली,तसेच जालना जिल्ह्यातील एका गावातील ६० एककर जमिन,आता भगवानगडाची जमिन ३५० एकर जमीन आहे.भीमसिंह महाराज एक उत्कृष्ट गायक होते,भिमसिंग महाराजांना गडावरून काढण्यासाठी दोन वेळा मोर्चा काढण्यात आले,आम्हाला देखील खुप त्रास झाला,पण आम्ही बाप निघालो,भगवानगड प्रॉपर्टी आहे,समुदायाचे ठिकाण आहे,महंत हे कीर्तनकार नसतात मालक असतात असे शास्त्री म्हणाले,
कंधार शहरात गेल्या वर्षभरातच सुंदर सुसज्ज असे भव्य मंदिर बांधण्यात आले असून या मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण कार्यक्रम महंत न्यायाचार्य नामदेव शास्त्री सानप महाराज यांच्या हस्ते पार पडले,असून या कार्यक्रमाला अनेक धार्मिक सामाजिक राजकीय व्यक्ती उपस्थित होते,
यावेळी अवधूत गिरी महाराज बाचोटी,गुरु नागेंद्र गयबी महाराज मठ संस्थान पानभोसी,ह.भ.प वासुदेव शास्त्री मुंडे,ह.भ.प माधव पोलेवाडी,ह.भ.प अश्विनीताई ईप्पर,मुखेडचे आमदार डॉ.तुषार राठोड, माजी आमदार गोविंद अण्णा केंद्रे,ईश्वरराव भोसीकर,शंकर अण्णा धोंडगे, डॉ.राम केंद्रे, हरिराव भोसीकर,शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडे,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रविण पाटील चिखलीकर,पुरुषोत्तम धोंडगे,भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबुराव केंद्रे,माजी जिल्हा परिषद सदस्य देविदास महाराज गिते,माजी सभापती बालाजी पांडागळे,सोपानराव केंद्रे,वंचित चे शिवाभाऊ नरंगले,या उपस्थिती होती,या कार्यक्रमासाठी महाप्रसादासाठी अन्नदाते म्हणून डॉ.पुरुषोत्तम धोंडगे यांनी सहकार्य केलेले आहे,या कार्यक्रमास हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता,या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन मा. प्राचार्य रामकृष्ण बदने यांनी केले,तर आभार भगवान बाबा ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.दिनकर जायभाये यांनी मांडले,
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भगवान बाबा प्रतिष्ठान कंधारच्या सदस्य व समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले,