फिटनेस नक्की काय आहे ??

 

काल मी एक व्हीडीओ शेअर केला होता.. दोन पायावर बसुन मागे न टेकता एक पाय वर करुन सॉक्स घालायचा आणि मग दुसरा पाय.. त्यावर अनेकांनी मला वैयक्तिक मेसेजेस केले.. आम्हाला जमत नाही.. पोट मधे येतं.. कोणी लिहीलं खाली बसायचे वांदे तर हे कधी जमायचं.
. मग हे कोणाला जमेल.??. जो रोज न चुकता व्यायाम करतो , ज्याला पोट नाही.. उंचीनुसार ज्याचं वजन आहे आणि ज्याची बॉडी फ्लेग्झीबल आहे अशा मंडळीना हे जमू शकतं..
ज्याला इंडीयन टॉयलेट मधे सहज बसुन उठता येतं तो फिट..
ज्याला जमीनीवर मांडी घालून बसुन जेवता येतं आणि आधार न घेता उठता येतं तो फिट..
जो एका पायावर दुसरा पाय ठेवून एका पायावर खुर्चीतुन उठुन उभा राहू शकतो आणि पुन्हा खुर्चीत बसु शकतो तो फिट..

जो मानसिक दृष्ट्या फिट आहे तो शारीरिक दृष्ट्या फिट रहातो त्यामुळे आपले विचार सगळ्यात महत्त्वाचे..
जो लोकांच्या फालतु कमेंटकडे दुर्लक्ष करुन स्वतःची प्रगती करतो तो फिट..
ज्याला स्वतःसोबत इतरांना सोबत घेउन जायचं आहे तो फिट..
दुसऱ्याबद्दल ज्याच्या मनात जेलसी नाही तो फिट..
जो दुसऱ्याच्या प्रगतीवर जळत नाही तो फिट..
जो सुर्यास्ताच्या आधी जेवतो आणि पोटभर न जेवता २० % पोट कायम रिकामं ठेवतो तो फिट.
जो व्यसनाना दुर ठेवतो तो फिट..
फिटनेसचे फंडे प्रत्येकाचे वेगळे असले तरीही शेवटच्या श्वासापर्यत आपल्याला आपला दिनक्रम करता यायलाच हवा आणि त्यासाठी रोज व्यायाम ही आपली F.D. आहे.. आज F.D. करुन उद्या व्याज मिळणार नाही त्यासाठी अनेक वर्षे सेव्हींग करावं लागतं .. रोज ४ वेळा खाऊन आठवड्यातुन एक दिवस व्यायाम करुन कसं चालेल…

शरीरात रोज साचणारे फॅट्स रोजच जाळायला हवेत ना.. शक्यतो नैसर्गिक व्यायाम आणि घरचा आहार यावर लक्ष केंद्रित केलं तर बऱ्याचशा अडचणी दुर होतात.. लक्झरी ही आपल्या स्वभावात हवी.. लक्झरी आपल्या कर्तृत्वात हवी.. लक्झरी आपल्या खळखळुन हसण्यात हवी.. लक्झरी आपल्या पर्स्नॅलीटीत हवी.. त्यामुळे कमीतकमी गाड्यांचा वापर आणि जास्तीत जास्त चालणं आपल्या फीटनेस ची लक्झरी वाढवु शकतो..

भौतिक गोष्टी या गरजेनुसार हव्यात नाहीतर त्या मिळवण्याच्या नादात आपण आनंद हिरावुन बसतो.. त्या वस्तु आपल्यासाठी आहेत आपण त्यांच्यासाठी नाहीत .. व्यायामामुळे येणारा ग्लो कुठल्याही क्रीममधे नाही.. पार्लर नको.. फेशीअल नको.. फक्त व्यायामाला जवळ करा आणि म्हणा.. फीट है बॉस..

#SonalSachinGodbole
#Sonalcreations
#SexEducation
#Proudtobeatranswoman
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *