कंधार तहसिल कार्यालयाच्या वतीने शहरात प्रभातफेरी काढून शालेय विद्यार्थांनी केली मतदान जनजागृती.

 

(कंधार : दिगांबर वाघमारे )

 

तहसिल कार्यालयाच्या वतीने स्वीप कक्ष आयोजित आज सोमवार सकाळी दि.1 एप्रिल रोजी बसस्थानक ते मुख्य रस्त्याने छञपती शिवाजी महाराज चौका पर्यत प्रभातफेरी काढून शालेय विद्यार्थांनी मतदान जनजागृती केली.लातूर
लोकसभा मतदारसंघाच्या सहाय्यक
निवडणूक निर्णय अधिकारी तथा कंधारच्या उपविभागीय अधिकारी सौ. अरुणा संगेवार यांच्या आवाहना नुसार कंधारचे तहसिलदार रामेश्वर गोरे यांनी योग्य असे नियोजन केले होते. प्रभातफेरी नंतर उपस्थित विद्यार्थांना व शिक्षक आणि कर्मचारी यांना मतदानाची प्रतिज्ञा दिली. जवळपास दिडहजार विद्यार्थांना खाऊचे वाटप करण्यात आले.

यावेळी निवडणूक नायब तहसीलदार रेखा चामणर, अनिल परळीकर, कंधार चे गटशिक्षणाधिकारी वसंत मेटकर, केंद्रप्रमुख माधव कांबळे,नोडल अधिकारी तथा केंद्र प्रमुख एन एम वाघमारे ,एम एन घुगे,डी एन मंगनाळे,विक्रम चुकलवाड,सौ संतोषी थगनर ,काशिनाथ सिरशीकर,नवनाथ बोळकेकर,
दिगांबर लोढे, राजेश पाठक, निवडणूक म.स.मठपती, निवडणूक समन्वयक मन्मथ थोटे आदींसह सर्व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *