अहमदपूर ( प्रा भगवान आमलापुरे ) भुमणीपुञ मोहन गणुजी नायक यांचा जन्मदिवस आज 02 एप्रिल ,गोरमाटी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करतात. त्यानिमित्ताने सोना गार्डन सभागृह,सारखणी ता किनवट येथे विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरील कार्यक्रमाचे उदघाटन सोहळा सकाळी ठीक 10 : 00 वाजता रंगणार आहे. यानंतर आठ ग्रंथाचे विमोचन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पार पडणार आहे.यात जग मोतीया – सुरेश मंगुजी राठोड, सं काव्यसंग्रह; आकांत – कवी अमोल नायक; संमेलनाध्यक्षीय भाषण – भुमणीपुञ मोहन नायक, झावळ – प्रा अरुण पवार; मंदळा – गणेश करमठोट; इतिहासवेत्ता – सं महेशचंद बंजारा मेमोरियल: समीसांज – डॉ के वी पवार; भिमणीपुत्र – मोहन भिकू पवार आणि गोरमाटी भाषा शब्दकोसा – सं धिरज नायक इ ती आठ ग्रंथ आहेत.
यानंतर लगेचच ‘ गोरमाटी भाषा, साहित्य दशा अन् दिशा ‘ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रा फुलसिंग जाधव, याडीकार पंजाबराव चव्हाण, नवल किशोर उर्फ नामा नायक, प्रा डॉ पंडित चव्हाण आणि भाऊराव चव्हाण आपापली मते मांडणार आहेत. अध्यक्षस्थानी श्री गोपाल चव्हाण, लातूर असणार आहेत. अरविंद जाधव सुत्रसंचालन करतील तर प्रेमचंद राठोड आभार मानतील.
भोजन अवकाशानंतर दुपारी साडेतीन वाजता खुल्या कविसंमेलन होणार आहे. कवी अरुण पवार, परळी हे अध्यक्ष आहेत.तर कवी शंकर राठोड ,मुखेड हे सुत्रसंचालन करतील. यात एन डी राठोड, अहमदपूर,वसंत जाधव, नांदेड, सखाराम जाधव राणीसावरगाव आणि इतर नामांकित कवी सहभागी होणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन बाराखडीकार गणेशराव चव्हाण आणि कवी विजय पवार यांनी केले आहे.