(कंधार. दिगांबर वाघमारे )
कंधार तालुक्यातील पेठवडज येथील तलावाच्या बाजुने पांदन रस्ता आहे. शेतकऱ्याने विरोध केल्याने या रस्त्याचे काम हे काम चालू नाही विशेष बाब म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी विरोध केला त्याची जमीनच तलावात गेली यांचे लेखी कागदपत्रे भुमी अभिलेख कार्यालयात आहेत सामाजिक कार्यकर्ते नारायण गायकवाड यांनीदोन महीण्यापासून कागदाची नक्कल मागत आहेत परंतु भुमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याने आज सोमवार दि.1 एप्रिल रोजी कार्यालयातच उपोषण केले . तब्बल दोन तासानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.
कंधार भुमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची चांगलीच मनमानी वाढली आहे. प्रमोद माळी यांच्याकडे लोहा आणि कंधार चा चार्ज असल्यामुळे कंधारच्या कर्मचाऱ्यांवर वचक राहिला नाही.शासनाच्या नियमानुसार कर्मचारी हे साडे नऊ वाजता कार्यालयात येण्याचा नियम आहे. परंतु येथील कर्मचारी हे अकरा वाजल्या नंतरच येत असतात.कामाच्या बाबतीत तर नागरीकांना एका कामासाठी दहा चकरा माराव्या लागतात.पेठवडज येथिल सामाजिक कार्यकर्ते नारायण गायकवाड यांनी पांदन रस्ता च्या कामासाठी काही कागदपत्राची दोन महिन्यांपूर्वी रितसर मागणी केली होती.या कार्यालयात सर्व कागदपत्रे उपलब्ध असताना सुद्धा येथील कर्मचाऱ्यांनी कागदपत्रे देण्यास तब्बल दोन महिने टाळाटाळ केली.यावर संतप्त झालेल्या नारायण गायकवाड यांनी दिनांक 1 एप्रिल रोजी सकाळी साडे नऊ वाजता भुमी अभिलेख कार्यालयातच उपोषणाला सुरुवात केली.यावर अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीने कागद तयार करुन दोन तासातच माहिती दिल्याने सदरील उपोषण माघार घेण्यात आले आहे.
या कार्यक्रमात सामान्य जनतेचे कामे वेळेवर होत नसुन कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नारायण गायकवाड यांनी केली आहे.