तरुणांनी नौकरीच्या मागे न लागता विविध प्रोजेक्ट तयार करून प्रगती साधावी -कवळे गुरुजी यांचे युवकांना आहवान

कंधार तालुक्यातील बारुळ,बाचोटी,धर्मापुरी, राहाटी, शिरूर,कोठा, चौकी येथे ऊस संदर्भात बैठक


कंधार (प्रतिनिधी)

कंधार तालुक्यातील बारुळ,बाचोटी,धर्मापुरी, राहाटी, शिरूर,कोठा, चौकी महाकाय येथे ऊस नेण्याच्या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.सिंधी व वाघलवाडा कारखान्याचे चेअरमन मारोतराव कवळे गुरूजी यांनी बारुळ येथे ऊस उत्पादक शेतक-याच्या उपस्थितीत ऊस गाळपाच्या वेळी ऊस लागवड विषयी माहिती दिली.

प्रारंभी   ऊस लागवड करत असताना शेतक-यांनी सुरुवात कशी केली पाहिजे.उत्पादनात वाढ कशी होईल या विषयी त्यांनी माहिती दिली. 

ज्यात ऊस लागवड करण्यासाठी निवडलेल्या जमिनिची पुर्वमशागत करणे गरजेचे आहे.(खोल  नांगर्टीं,रोटावेटर करणे ) मशागत केलेल्या जमिनी मध्ये रासायनीक खताचा वापर न करता सेंद्रिय खते टाकावे  जसे शेनंखत  गांडुळ खत हिरवळीचा खत,कोंबडीचे खत,कारखान्यातील मळी,

ऊस लागवडीसाठी निवडलेले बेणे हे योग्य वयातील व निरोगी असलेले पाहिजे.निवडलेल्या निरोगी बेण्यास कीटकनाशक व बुर्शिनाषक यांनी बीजप्रक्रिया करुन घेणे महत्वाचे आहे. लागवड करताना सरीतील अंतर हे निवडलेल्या जमिनीच्या सुपिकता व कस पाहुन ठरवावा.ऊस लागवड करण्यापूर्वी सरीमध्ये   रासायनीक खंताचा माञा बेसल डोस टाकुन घ्यावा व ऊस लागवड करावी. पाण्याचे व्यवस्थापन ठिंबक सिंचनाद्रवारे केल्यास पिकाला लागेल  तितके पाणी लागेल त्या वेळेला मदत होईल.

ठिंबक सिंचनाद्वारे   पाणी व खताची माञा दिल्यास ते ऊसाच्या मुळांच्या सांनिध्यात योग्य रितीने व  पिकास जलद लागु होईल आणी खतांचे होणारे नुकसान टळेल.कीड व रोगांचे व्यवस्थापन  योग्य पध्दतीने व योग्य वेळेत करणे गरजेचे आहे. ऊसाची योग्य वाढ झाल्या नंतर ऊसाचे पाचट काढुन सरीमध्ये दाबुन घ्यावे व कुजवावे, शक्य झाल्यास ऊसाची बांधणी करावी असे  उपस्थितीत शेतक-यांना मार्गदर्शन केले.

आपला  कारखाना जास्त काळ चालावयासाठी शेतकर्‍यांनी टप्या-टप्याने लागवड करने गरजेचे आहे त्यासाठी आडसाली म्हणजे जुन,जुर्ले, ऑगस्ट,पर्व हंगामी म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर व सुरु डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी   आशा वेगवेगळ्या हंगामात लागवड करने गरजेचे आहे एकाच हंगामा मध्ये सर्व शेतकर्‍यांनी लागवड केल्यास सर्वांचा ऊस एकदाच गाळप करBने  शक्य होत नाही त्यामुळे प्रत्येक हंगामात शेतक-यांनी ऊस लागवड झाली तर सर्वांचा ऊस वेळेवर तुटण्याच आडचन येनार नाही असे कवळे गुरूजी म्हणाले.

तसेच कंधार तालुक्यातील बारुळ ,धर्मापुरी, बाचोटी, राहाटी, कौठा, शिरुर, येथील शेतकऱ्यांना ऊस नेण्याच्या संदर्भात बैठका घेण्यात आल्या.बारुळ परिसरातील शेतकऱ्यांना हक्काचा कारखाना मिळाला नाही,कुणीही यावे टिकली मारून जावे अश्या प्रमाणे बारुळ परिसरातील शेतकऱ्यांची अवस्था झाली यानंतर बारुळ परिसरातील शेतकरी सुजलाम सुफलाम तसेच प्रत्येक शेतकरी प्रगतशील केल्या शिवाय राहणार नाही असेही आव्हान यावेळी कवळे गुरुजी यांनी केले.

पुढे बोलताना म्हणाले मन्याड नदी म्हणजे सोन्याची घागर असण्यासारखे आहे याचा शेतकऱ्यांनी पुरेपूर फायदा घ्यावाआपला विभाग पश्चिम महाराष्ट्र सारखा होण्यास विलंब लागणार नाही असाही आशावाद कवळे गुरुजी यांनी व्यक्त केला .

यावेळी बारुळचे सरपंच शंकरराव नाईक,लक्ष्मण पाटील हरेगावकर,दिगंबर पाटील वडजे(प.स.सदस्य कंधार) माजी जि.प.सदस्य धोंडीराम बोडलवाड, शंकरराव जाधव,कोंडीबा पाटील वडजे, नारायण सावकार कुंभारे,अमोल पाटील बसवडे,शरद भागानगरे, ऊस पुरवठा अधिकारी शिंदे साहेब,शिरसे साहेब,मुकीद पठाण युनूस शेख,आनंद शिंदे,यांच्यासह बारुळ परिसरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *