सामाजिक काम आणि दिखावा..

 

आपण प्रत्येकजण समाजासाठी , प्राण्यांसाठी , निसर्गासाठी कृतज्ञतापुर्तीसाठी काहीना काही करतच असतो..
जे आपल्याला मिळालय त्यातला एक घास वेगवेगळ्या रुपात आपल्याला रीटर्न करायचा असतो पण ते करताना शोऑफ न करता प्रामाणिकपणे सातत्याने ते काम करत राहायचे असते..

माझ्यासकट कोणीही निस्वार्थी भावनेने काहीही करत नाही कारण आपण माणसे आहोत त्यामुळे आपली काहीना काही अपेक्षा ही असतेच पण अपेक्षा करताना सामाजिक काम बाजूला रहातं आणि दिखावा समोर येतो.. काल जेव्हा आम्ही गाण्याचा कार्यक्रम घेउन वृध्दाश्रमात गेलो आणि तिथे गेल्यावर मी रील केलं त्यामागे भावना होती की नवरत्नओल्डएज होम ची ॲड व्हावी आणि भगवंताने मला वक्तृत्व दिलय आणि भरपुर फॅनफॉलोवर आहे त्याचा उपयोग अनिता राकडे ज्या हे वृध्दाश्रम चालवतात त्यांना व्हावा ही शुध्द भावना होती .. मी जर रील किवा फेसबुक लाइव्ह केलं नसतं तर ना अनितामॅमचं काम समोर आलं असतं ना आमचे गायक मित्र यांचं टॅलेंट समोर आलं असतं म्हणजेच काय यात स्वार्थ नाही पण अशी अनेक मंडळी आहेत जी १०० रूपयाची वस्तु द्यायची आणि फोटो व्हीडीओ करुन सोशल मिडीयावर १०००० ची प्रसिद्धी करायची..

काही जणतर १०० रुपये पण खर्च न करता कोणीतरी आणलेल्या वस्तुला हात लावून फोटो काढून घेउन त्याला सोशल मिडीयावर असा काही आव आणतात की आम्हाला त्याची लाज वाटते पण त्यांना काहीच वाटत नाही.. काहीजण तर फुकट खायला मिळतं म्हणुन ताव मारतात पण जे खरच मनापासून काम करतात ते स्वतःला चांगल्या कामाला आपण माध्यम झालो म्हणत २ मिनीटात त्यातून बाहेर पडतात कारण त्यांचा आपल्या कर्मानुसार भगवंत फळ देणारच यावर विश्वास असतो..त्याला निष्काम कर्म म्हटलं जातं. जे काम फक्त आणि फक्त भगवंतासाठी केलं जातं याचा उल्लेख भगवद्गीतेमधे आहे..सकाम आणि निष्काम कर्म यातील फरक समजला तर आपण सामाजिक काम आणि दिखावा यातून बाजूला राहु शकतो.. सामाजिक काम करताना प्रत्येकवेळी पैसा लागत नाही.. दुसऱ्यासाठी दिलेला वेळ हेही सामाजिक कामच आहे.. एकमेकांना एकमेकांशी जोडून देणं हेही सामाजिक कामच आहे..

 

आजी आजोबांशी गप्पा मारणं असेल त्यांना कविता , कथा वाचून दाखवणं असेल त्यांच्यासाठी गाणं सादर करणं असेल हेही सामाजिक कामच आहे.. ठरवलं तर अनेक प्रकारे आपण समाजाला मदत करु शकतो.. ज्याच्याकडे जे आहे त्याने ते द्यावं आणि दिलेलं विसरुन जावं पण कोणी आपल्यासाठी काही केलं तर ते कधीही विसरु नये..
अनिता मॅमनी दोन आजीपासुन सुरुवात केलीआणि आज त्यांच्याकडे जवळपास ४० आजी आजोबा आहेत..

 

स्वतःच्या व्यक्तीचा डायपर बदलताना सुध्दा आपल्याला घाण वाटते इथे तर कोण कोणाचं असतं आणि त्यांच्यासाठी आंघोळ घालण्यापासुन सगळं करायचं किती पुण्य त्या माऊलीच्या पदरात जमा होइल याची आपण काल्पनिकही करु शकत नाही.. काल आम्ही सगळे फोटो , सेल्फी.. फेसबुकलाइव्ह यात बिझी असताना त्या आजोबांच्या उशाशी बसून होत्या का तर त्या आजोबांना सलाइन लावली होती आणि कार्यक्रम सुरु असताना आजोबांना ॲडमीट केले.. कार्यक्रमात फोटो काढायला किवा मिरवायला त्या कुठेही पुढे आल्या नाहीत हे खरं सामाजिक काम..ही खरी सेवा.. गेली ६/७ वर्षे मी त्यांच्याकडे जातेय पण त्या करत असलेल्या कामाचा कुठलाही बडेजाव नाही .. त्यांना काहीतरी विचारलं की त्या दुसरं कोणाला तरी बोलायला पुढे करतात.. खरं तर हे मलाही
जमणार नाही..

 

आपण समाजात वावरतो तेव्हा आपण प्रत्येकाकडुन काहीना काही शिकतो पण आपल्याकडे असलेले दुर्गुण आपण सोडत नाही.. फक्त सोशल मिडीयावर राहून टिका करणं खूप सोप्पं आहे पण जेव्हा अशा निस्वार्थी काम करणाऱ्या लोकांसमोर जातो तेव्हा आपलीच आपल्याला लाज वाटते आणि ती जेव्हा वाटेल तेव्हाच आपण बदलु नाहीतर आलेला दिवस ढकलायचा हीच मानसिकता ठेवली तर प्रगती होणारच नाही.. नवरत्न ओल्डएजहोम या नावाने फेसबुकवर पेज आहे ते फॉलो करा त्यावर मॅमचा नंबर आहे.. जमेल ती मदत करायला हात आखडता घेउ नका.. तुम्ही दुसऱ्यासाठी खर्च केलेला एक रुपया तुम्हाला १ लाख रुपये देउन जाईल फक्त तो रुपया विसरुन जायची आपली तयारी हवी.. व्यसनं , पार्ट्या , वाट्टेल तसं वागणं हे आयुष्य नसून दुसऱ्यासाठी चांगला विचार करणं म्हणजे सर्वार्थाने जगणंआहे ..

 

काल माझ्या फ्रेन्ड्सनी गाण्याची जी सेवा दिली त्याबद्दल त्यांना माझ्याकडून ( भगवंताकडुन ) आइस्क्रीम ट्रीट आहेच पण त्यांची मनापासून कृतज्ञता व्यक्त करते.. आपण सगळे माध्यम आहोत हाच विचार सतत डोक्यात असेल तर डोक्यात हवा जाणार नाही.. कर्म करत राहु.. फळाची अपेक्षा नकोच.. पाहुयात जमतय का..

#SonalSachinGodbole
#Sonalcreations
#SexEducation
#Proudtobeatranswoman
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km ( माझा जीवनप्रवास )
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *