सामाजिक क्रांतीचे अग्रदूत: महात्मा ज्योतिबा फुले* *11 एप्रिल जयंती विशेष

 

 

महाराष्ट्रातील प्रबोधनवादी चळवळीतील अग्रगण्य विचारवंत, तसेच कर्त समाजसुधारक, पारंपरिक आणि जुन्या चालीरीती ,वर्णव्यवस्था जातीयता आणि गुलामगिरी याच्या विरुद्ध त्यांनी लढा उभारला. जनसामान्याच्या स्वाभिमानाची जपणूक करण्यासाठी त्यांनी स्वतःचे आयुष्य पणाला लावले, अभंग या शब्दाबद्दल अखंड हा शब्द त्यांनी वापरला .आपण सर्वजण देव, परमेश्वर सृष्टीचा कर्ता असे देवा बद्दल विशेषण लावतो परंतु त्यांनी परमेश्वराला *निर्मीक* असे म्हटले आहे. मनाला भिडणारी तसेच वास्तववादी असणारी परखड भाषा त्यांनी बोलली.
महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला. बहुजन समाजाच्या हिताविषयी त्याकाळी कोणालाही आस्था वाटत नव्हती. तत्कालीन समाज सुधारक बहुजन समाजापेक्षा पांढरपेशा वर्गाच्या सुखाचा अधिक विचार करताना दिसत असत, संपत्ती व सत्ता यांचा विचार करून बलवान होण्याची ध्येय बाळगत होते. अशा काळात समाजासाठी त्यांच्या उद्धारासाठी झिजणारा एकमेव कृतिशील विचारवंत म्हणजे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले होते. बहुजन समाजाचे दुःख, कष्ट, वेदना
,हालाखीचा संघर्ष प्रत्यक्ष त्यांनी पाहिला. हिंदू धर्मात असलेल्या वाईट रूढी, परंपरा, या सर्वांच्या मुळाशी जाऊन त्यांनी जीवन अनुभवातून बिकट परिस्थितीवर मात केली, नवीन परिस्थिती जन्माला घालण्याचे अलौकिक सामर्थ्य त्यांच्यात होते. म्हणूनच त्यांना *सामाजिक क्रांतीचे अग्रदूत असे म्हणतात* महात्मा फुले यांच्या विचारामुळे महाराष्ट्रातील समाज व्यवस्थेत अमुलाग्र बदल घडून आला. बहुजन समाजाच्या दुःखाचे गरिबीचे व मानसिक गुलामगिरीचे कारण त्यांना कळाले .स्त्री शिक्षणा साठी व अस्पृश्यांना
माणुसकीचे हक्क मिळावेत, यासाठी त्यांनी अपूर्व लढा उभारला. शूद्रांना कशी पिळवणूक करतात. त्यांच्या हाल अपेष्टा कशा असतात. त्यांची वागणूक ही मुक्या प्राण्यांपेक्षा वाईट होती
गरीब लोकांना लाचारीचे, गुलामगिरीचे जीवन जगावे लागत होते. म्हणून त्यांनी सामाजिक परिवर्तनाची लढाई स्वतःच्या हातात घेतली. ब्राह्मण ,क्षत्रिय ,वैश्य ,शूद्र ही उतरंड त्याकाळात निर्माण केली होती. ही वर्णव्यवस्था त्यांनी झिडकारून लावली. बहुजन समाजाला रोजगार व निवारा महत्त्वाचा आहे हे त्यांना कळाले .त्यांच्या काळात समाजात अस्पृश्यता ,भेदभाव पराकोटीला पोहोचली होती, ती सर्व त्यांनी बाजूला सारून शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवली. तसेच विधवा पुनर्विवाहास परवानगी दिली. सडेतोड व परखडपणे ते बोलत असत. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली .नाभिकांचा संप घडवून आणला
.त्यामुळे महिलांचे केशवपन बंद झाले
. केशवपन केल्यामुळे महिला विद्रूप दिसू लागल्या, समाजात चेष्टेचा विषय निर्माण झाला. म्हणून त्यांनी केशवपन पद्धतच बंद केली. समाजामध्ये अज्ञान ठासून भरले होते. जो तो बहुजन समाजावर अन्याय करत असे
,समाजाला शिक्षण दिल्याशिवाय गती प्राप्त होणार नाही हे त्यांनी ओळखले ,म्हणून साहित्य क्षेत्रामध्ये गुलामगिरी नावाचा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला,शेतकऱ्यावर कसा अन्याय केला जातो हे त्यांनी शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथातून सांगितले. ब्राह्मणाचे कसब,इशारा, सार्वजनिक सत्यधर्म, या ग्रंथाचे लिखाण करून समाजात वैचारिकदृष्ट्या परिवर्तन केले.
सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे अस्पृश्य लोकांना स्वतःच्या घरातील पिण्याच्या पाण्याचा हौद खुला करून दिला. ही त्या काळातील क्रांतिकारी घटना होती. समाजामध्ये असे कार्य करून देणारे ते पहिले महान व्यक्ती होते.एखाद्या महिलेचा पाय चुकून पडला असेल तर त्यांच्याच घरामध्ये प्रसृती गृह तयार केले होते. यशवंत नावाच्या मुलाला दत्तक घेऊन त्याला डॉक्टर बनवले. आयुष्यभर दोघा पती-पत्नी समाज सेवेसाठी झिजले, घरच्या लोकांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी हे कार्य केले. आज समाजामध्ये कशी परिस्थिती चालू आहे याचा ज्यांनी त्यांनी विचार करावा.एवढं समाजा साठी कोण करू शकतो, ते ही पहावे त्या काळात असणारी समाज व्यवस्था आणि आजची समाज व्यवस्था यांच्यात काय फरक झाला त्याचा विचार आजच्या लोकांनी करावा. इंग्लंडचे राजकुमार ड्युक ऑफ कॅनॉट पुणे या ठिकाणी आले होते, त्यांना भेटण्यासाठी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले फाटके कपडे परिधान करून गेले
,त्यांनी त्यांच्या भाषणात *मी भारतीय गरीब जनतेचा प्रतिनिधी म्हणून आलो आहे*, असे ठामपणे सांगितले. भारताची खरी परिस्थिती पाहायची असेल तर माझ्याबरोबर तुम्ही खेड्यात चला असे त्यांना बजावले. यावरून आपल्या समाजातील लोकांबद्दल किती तळमळ होती हे आपल्या लक्षात येईल. शेतकरी ,कामकरी ,कष्टकरी, गरीब ,रंजलेले गांजलेले, दुःखी, पीडित, अनाथ, अन्यायग्रस्त या सर्वांना घेऊन ते चालत होते; म्हणूनच त्यांना सामाजिक क्रांतीचे अग्रदूत असे ठामपणाने म्हटले जाते. ग्रामीण समाजाच्या दारिद्र्याचे कारण वर्णव्यवस्थेत आहे .कारण वर्ण व्यवस्थेतील अंकाप्रमाणे चौथा वर्ण म्हणजे शूद्र या लोकांची आपल्या अंगावर सावली पडू नये या लोकांनी थुंकी सुद्धा गाडग्यात, मडक्यात थुंकावी ,पायाला खराटे बांधावेत, रामायण, महाभारत, वेद ऐकल्यास यांच्या कानात उकळलेले तेल टाकावे. इतकी भयानक परिस्थिती त्या काळामध्ये सुरू होती, त्यांना सुधारण्या साठी प्रत्यक्षात या महात्म्याने शाळा काढून यांचे जीवन चैतन्यमय केले ,म्हणूनच त्यांना कृतिशील विचारवंत म्हणण्यास काहीच हरकत नाही, ते एक प्रखर बुद्धिवादी समाज सुधारक होते,
कधीही त्यांनी आपल्या स्वतःच्या संसाराचा विचार केला नाही. जगेल तर फक्त बहुजन समाजासाठी अशा रीतीने त्यांनी जीवन जगले , त्यांची संपूर्ण निष्ठा समाजातील लोकांवर होती, म्हणून आज त्यांचे विचार सदैव प्रेरणादायी आहेत. त्यांचा पिंड हा शैक्षणिक व सामाजिक कार्य करण्यासाठीच होता.स्त्री- पुरुष समानता त्यांनी प्रत्यक्ष रुजवली . विरोधाला न जुमानता त्यांनी प्रत्यक्ष कार्य करून दाखवले. मित्राच्या विवाहाला मिरवणुकीमध्ये जात असताना उच्चवर्णीयानी तो आमच्या बरोबरीचा नाही ,म्हणून त्यांना मिरवणुकीतून बाहेर काढले, आणि त्यांचा स्वाभिमान जागा झाला. माझ्यासारख्या विद्वानाला जर अशी परिस्थिती निर्माण झाली असेल तर इतर लोकांचे काय अवस्था होत असेल? याची त्यांनी आत्मचिंतन केले
हे विचार त्यांना शांत बसू दिले नाहीत. म्हणूनच त्यांनी शैक्षणिक व सामाजिक कार्याचा विडा उचलला. अनिष्ट रूढी. प्रथा ,परपंरा या गुंडाळून ठेवल्या. आजारपणामध्ये सुद्धा त्यांनी सामाजिक कार्यासाठी सरसावले. बहुजनाचा उद्धार करण्यासाठीच आपण जन्म घेतला आहे असे त्यांना वाटत होते, म्हणून त्यांनी आपले कार्य जोमाने चालू ठेवले. विरोधाला विरोध न करता प्रत्यक्ष कृतीने उत्तर दिले, कमी जास्त बोलणा-याचे तोंड त्यामुळे आपोआप गप्प झाले. माणसाला जर शिक्षण व्यवस्थित मिळाले नाही तर त्याची नीती, गती, मती, वित्त सर्व काही शिक्षणामुळे निघून जाते असे ते म्हणतात. आज भारतीय समाजात शिक्षणाची गंगा घरोघरी आली संख्यात्मक भरपूर विकास झाला. गुणात्मक विकास तेवढा झालेला नाही. फक्त शहरे फुगले म्हणजे विकास होय, असे नाही ,मुठभर लोक समाजातले सुधारले गुणवान झाले, म्हणजे समाज सुधारला असे ही नाही, जोपर्यंत तुम्ही एकमेकांना मदत करत नाही,तोपर्यंत आपण एकत्रित राहू शकत नाही.साखरेचा कण जसा दुधाशी एकरूप होतो .तसे प्रत्येक माणूस आपल्या समाजाशी एकरूप झाला की समाज सुधारतो. हेवेदावे बाजूला काढून अहंकारपणा कमी करून *जे जे आपणाशी ठावे। ते ते इतरांशी सांगावे। शहाणे करून सोडावे* *सकळजन* ।। असे म्हटल्यास प्रत्येक व्यक्ती हुशार बनतो. त्यासाठी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार अनमोल असून सदैव प्रेरणादायी आहेत. आजच्या तरुणांनी त्यांचे संपूर्ण जीवन चरित्र वाचावे. त्यातून बोध घ्यावा.आपला अमूल्य वेळ वाया घालू नये .तेव्हा तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले कळतील. ज्यांनी सामाजिक विषमतेचे चटके सोसले. अपमान सहन केला. तरीही त्यांनी कुठेच माघार घेतली नाही. अखंड तेवत असणाऱ्या ज्योतीप्रमाणे ते राहिले. खरोखरच त्या पती-पत्नीने सकल समाजासाठी अहोरात्र श्रम केले. गरिबांचे अश्रू पुसले, निराधारांना आधार दिले, जे चुकले त्यांना मार्गदर्शन केले, पाठीमागे राहिले त्यांना समोर आणले. वास्तविक जीवन संघर्षातून समाज उभा केला. म्हणूनच ते महात्मा झाले. म्हणूनच सरकारने त्यांच्या नावावर अनेक योजना काढले आहेत ,महाराष्ट्र सरकारने पुणे विद्यापीठाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नामकरण करून त्यांच्या कार्याची पावती दिली. महात्मा ज्योतिबा फुले कृषी विद्यापीठ राहुरी असे नाव दिले ,जे समाजासाठी लढले। ते अमर हुतात्मे झाले।। समाजातील धार्मिक व सामाजिक गुलामगिरी नष्ट केली.सर्वत्र समता प्रस्थापित करणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्टे होते. अशा या महान कृतीशील विचारवंतास जयंतीच्या निमित्ताने विठू माऊली प्रतिष्ठान खैरकावाडी यांच्या वतीने विनम्र अभिवादन.

*प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपत*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *