(कंधार : दिगांबर वाघमारे )
88 लोहा विधानसभा मतदार संघातील स्वीप कक्षा अंतर्गत पथकांनी कंधार शहरातील सर्व खाजगी डॉक्टरांची भेट घेवून मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी आज दि.10 एप्रिल रोजी जनजागृती करण्यात आली. त्याला कंधार येथिल खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रतिसाद देत आगामी 7 मे रोजी लोकसभेच्या मतदानाच्या दिवशी मतदान करून दवाखान्यात तपासणीसाठी येणा त्या रुग्णांना अनोखी ऑफर दिली आहे ” बोटाची शाई दाखवा मोफत तपासणी करून घ्या असे आवाहन करून अनोख्या पधतीने मतदान जनजागृती करण्याचा संकल्प केला.
41-लातूर लोकसभेच्या निवडणुकीसाठी 88- लोहा विधानसभा मतदारसंघ अंतर्गत लोहा व कंधार तालुक्यामध्ये लातूर
लोकसभा मतदारसंघाच्या सहाय्यक
निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सौ.अरुणा संगेवार, लोहा तहसीलचे तहसीलदार विठ्ठल परळीकर साहेब आणि कंधार तहसीलचे तहसीलदार रामेश्वर गोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जागृती पथक कक्ष प्रमुख गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे,केंद्रप्रमुख एन.एम.वाघमारे, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक काशिनाथ ,नवनाथ बोळकेकर,माधव भालेराव, एम.एन.घुगे व डी.एन. मंगनाळे यांची टीम मतदार संघात जन जागृतीसाठी विविध उपक्रमांतर्गत मतदानाचे संदेश घरोघरी शाळा कॉलेज, परिसर आणि विटभट्टी, पाल आदी ठिकाणी पोहोचण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे.
त्याचाच भाग म्हणून आज प्रत्येक दवाखान्यात जावून डॉक्टरांना मतदान जनजागृती SVEEP अंतर्गत शिक्के देऊन मतदान जनजागृतीत सहभागी होण्याची विनंती करण्यात आली.त्याला कंधार येथिल डॉक्टर जाधव, डॉक्टर केंद्रे, डॉक्टर दिपक बडवणे, डॉक्टर फाजगे,डॉक्टर कागणे, डॉक्टर तायडे यासह अन्य डॉक्टरांनी प्रतिसाद देऊन 7 मे ला मतदान करा आणि 8मे ला बोटाची शाई दाखवा आणि मोफत तपासणी करुन घ्या असा हा संकल्प
डॉक्टरांनी केला. र्या प्रतिसादा बदल डॉक्टरांचे लातूर
लोकसभा मतदारसंघाच्या सहाय्यक
निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सौ.अरुणा संगेवार तसेच स्वीप कक्ष 88 लोहा तर्फे अभिनंदन करण्यात आले.