पुरस्कार म्हणजे एक नवी जबाबदारी – देविदास फुलारी….!  फुले – आंबेडकरांना कवितेतून अभिवादन ; कविसंमेलनास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

नांदेड – डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी एक नवी जबाबदारी आहे असे प्रतिपादन येथील सुप्रसिध्द विचारवंत साहित्यिक देविदास फुलारी यांनी केले. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सहयोग नगरच्या बुद्ध विहारात सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
सामाजिक तथा शैक्षणिक क्रांतीचे जनक महात्मा फुले आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नांदेडच्या कवी कवयित्रींनी आपल्या स्वरचित कवितांच्या सादरीकरणातून अभिवादन केले. संयुक्त जयंती सोहळ्यात झालेल्या कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री जया सूर्यवंशी ह्या होत्या तर विशेष निमंत्रित अतिथी कवी देविदास फुलारी, प्रमुख पाहुणे भदंत शिलरत्न थेरो, फुले आंबेडकरी चळवळीतील साहित्यिक तथा आंबेडकरी निवेदक अॅड. डॉ. भीमराव हाटकर यांची उपस्थिती होती.
             शहरातील सहयोग नगरच्या माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार समितीच्या वतीने फुले आंबेडकर जयंती निमित्त कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध, म. फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्प पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर याचनेवरुन भिक्खू शिलरत्न यांनी उपस्थितांना त्रिसरण पंचशील दिले. त्यानंतर रीतसर कविसंमेलनास प्रारंभ झाला. यात चंद्रकांत कदम, मारोती मुंडे, प्रल्हाद घोरबांड, उषाताई ठाकूर, थोरात बंधू, नागोराव डोंगरे, प्रज्ञाधर ढवळे, अनुरत्न वाघमारे, शरदचंद्र हयातनगरकर, रुपाली वागरे वैद्य, बी. जी. कळसे, प्रा. महेश मोरे, पांडुरंग कोकुलवार, मनोज साखरे, मारोती कदम, शिला कोकाटे, डी. एम. मोरे आणि अक्षयकुमार यांनी आपल्या स्वरचित कवितांच्या सादरीकरणातून महामानवास अभिवादन केले.
            दरम्यान, साहित्यिक देविदास फुलारी यांना राज्यशासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल बुद्ध विहार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद तर झालाच पण हा पुरस्कार म्हणजे एक नवी जबाबदारी आहे आणि मी ती समर्थपणे पेलणार आहे, असे फुलारी यावेळी म्हणाले. कविसंमेलनाचे सूत्रसंचालन अॅड. डॉ. भीमराव हाटकर यांनी केले तर आभार आर. पी. कोकरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार समितीचे रमेश सूर्यवंशी, राजाराम सूर्यवंशी, प्रकाश कोकरे, आर. पी. कोकरे, राजेश बिऱ्हाडे, डी. डी. भालेराव, ढोले, कंधारे, मगरे यांनी तर माता रमाई आंबेडकर महिला मंडळाच्या शेरेताई, आठवले, रणवीर, लंके, अवसरे, इंगोले, इंगळे, लांजेवार, सोनाळे, गजभारे यांनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *