दिव्यांग हरहुनरी कलावंत दत्तात्रय एमेकर यांनी केली काव्यातून मतदान करण्याची जागृती

 

कंधार : प्रतिनिधी

१८ व्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजले असून, शासन स्तरावर मतदारराजांने आपल्याला मिळालेल्या भारतीय संविधानाने दिलेल्या हक्काच मतदान करुन जगातील सर्वात विशालकाय लोकशाहीला चिरायू करण्यासाठी सर्वांनी आपला मतदानाचा हक्क येत्या लोकसभेच्या निवडणुकीत बाजावयचा आहे, येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करुन लोकशाही बळकट करण्याचा संकल्प मुळगाव बहादरपूरा, ता. कंधार येथील हरहुन्नरी कलावंत कविराज गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी यांनी आपल्या श्रेष्ठदान काव्याची जनजागृती निमित्त केलेले काव्य श्रीमती अरुणा संगेवार सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ८८ लोहा तथा उपविभागीय अधिकारी कंधार यांना भेट दिली.

यावेळी कंधारचे तहसीलदार रामेश्वर गोरे, लोहा तहसीलदार विठ्ठल परळीकर यांच्या उपस्थितीत उपविभागीय आधिकारी श्रीमती अरुणाताई संगेवार मॅडम यांना लोहा येथील तहसील कार्यालयात दिव्यांग कलावंत गोपाळसुत दत्तात्रय एमेकर यांनी जनजागृती संदेश भेट दिला. त्यावेळी संगेवार मॅडम यांनी या जनजागृती कवितेचा दिलेला फ्रेम आपल्या कक्षात लावून सन्मान केला. सौ संगेवार यांनी दिव्यांग कलावंताच्या काव्याचे तोंडभरून कौतुक केले.

येत्या लोकसभेच्या निवडणुकीत उत्कृष्ट संदेश काव्याचे कविराज दत्तात्रय एमेकर यांनी वाचन केले. त्या प्रसंगी स्विप कक्ष प्रमुख एन.एम. वाघमारे, एन. एम. घुगे, मन्मथ थोटे, माधव भालेराव, दत्तात्रय मंगनाळे यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *