Post Views: 385
कष्टाने आयुष्य बेस्ट होते, त्यातून गरिबी नष्ट होते. असंच एक उदाहरण म्हणजे, ग्रामीण भागातील दुर्बल घटकातील नवयुवक रवी गादेकर रा. कोलंबी ता. नायगाव खै. जि. नांदेड येथील ते रहिवासी असून. अत्यंत काटकसरीने आपल्या जीवनाला सजवण्याचे आणि आपल्या आई वडिलांच्या कष्टाला फळ आणि स्वतःला बळ त्यांनी प्रत्यक्षात घडवून आणले.
रवी गादेकर यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. आज समाजासमोर एक आदर्श चेहरा निर्माण करून त्यांनी आपल्या आई-वडिलांचा मान सन्मान वाढविला. त्यांच्या निवडीबद्दल, सुरेश देशपांडे यांच्या निवासस्थानी, दि.17 एप्रिल 2024 रोजी. काबरा नगर, नांदेड येथे पोलीस उपनिरीक्षक रवी गादेकर यांचा सत्कार समारंभ आणि कौतुक सोहळा उत्साहात संपन्न झाला.
यावेळी,
सुप्रसिद्ध निवेदक तथा युवा साहित्यिक सोनु दरेगावकर, नांदेड, संभाजी गादेकर, उत्तमराव गवाले, डॉ नितीन मोरे, युक्रांद देशपांडे, संजय राजे, अविनाश बामणे, संभाजी रामशेटवाड, येडे सर, मारकवाड सर, संतोष आमणवाड, संजय गवलवाड, व्यंकटेश जोशी, मनोज गाजरे, सुनिल तातुस्कर, शंकर पवितवार, मुरलीधर पाटील, विनोदराव जोशी, लक्ष्मीकांत देशपांडे, नंदकुमार पाटील, अमोल एडके, राहुल एडके, अनिल गवाले यांनी रवी गादेकर यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध व्याख्याते पी. बी. वाघमारे कोलंबीकर यांनी केले तर आभार सुरेश देशपांडे यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देशपांडे कुटुंबीयांनी परिश्रम घेतले.