कंधार : प्रतिनिधी
आजच्या विज्ञान युगात व बदललेल्या जीवनशैलीमध्ये सगळीकडेच बदल झालेला असतानाही शिक्षकांचे कार्य मात्र अजूनही दीपस्तंभासारखे प्रेरणादायी असून आज ही समाजामध्ये शिक्षकाचे स्थान अग्रस्थानी आहे शिक्षक हे समाजातील चालते बोलते विद्यापीठ असतात. त्यामुळे शिक्षकांनी अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांना बाहेरचे व्यवहारिक ज्ञानही देतात.शाळेत विद्यार्थीप्रिय म्हणून शिक्षक अशी ओळख निर्माण करतात.
श्रीमती गंगाबाई प्राथमिक शाळा कंधार चे उपमुख्याध्यापक भगवान केंद्रे ३७ वर्ष प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत होत आहेत. त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दिनांक ३ मे २०२४ शुक्रवार रोजी इच्छापूर्ती हनुमान मंदिर, संगमवाडी ता. कंधार जि.नांदेड येथे संपन्न झाला.
भगवान माधवराव केंद्रे (उपमुख्याध्यापक) यांचा सेवानिवृत्ती सोहळा त्यानिमित्ताने
ह.भ.प.प्रभाकर महाराज झोलकर (नाना) यांच्या भव्य किर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला.मृदंगाचार्य ह.भ.प.तालमनी नामदेव मा. केंद्रे आनंदवाडीकर यांची साथ लाभली आहे. गायक म्हणून ह.भ.प. गोपीनाथ गुरुजी केंद्रे यांची साथ लाभली तर कार्यक्रमाचे अध्यक्ष संभाजी पाटील केंद्रे (माजी उपसभापती, पं.स. कंधार व संचालक महात्मा फुले विद्यालय शेकापुर ) प्रमुख पाहुणे ह.भ.प.प्रभाकर महाराज झोलकर (नाना) , बालाजी डफडे ( माजी केंद्रप्रमुख , योगेश मुंडे , गोविंद मुसळे , डी.जि. वाघमारे(मुख्याध्यापक ), वाघलगावे सर( मुख्याध्यापक ) , महमद अन्सरोदीन ( मुख्याध्यापक) गोविंद मुंडे ( पी एस आय ) सुनील राठोड ,डॉ.लक्ष्मण जायभाये ,बाळू गर्जे , शंतनु कैलासे, डॉ.दिनकर जायभाये ,प्रवचनकार माधव मुसळे ,सूर्यकांत घुगे ( जमदार) उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्ताविक कृष्णा भगवान केंद्रे यांनी मांडले ते म्हणाले की आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भारतीय सेना मधून देशाची सेवा करत आहे. त्यांनी मोठमोठ्या संकटाला तोंड देऊन आम्हाला घडविले अशा खडतर प्रवासामध्ये त्यांनी कोणत्याही संकटाला न जुमानता आम्हाला स्वतःच्या पायावर उभे केले.
म.फु.शि.प्रसारक मंडळ संस्थेचे संचालक अध्यक्ष मा.संभाजी पाटील केंद्रे यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात म्हणाले की महात्मा फुले विद्यालय शेकापूर तसेच श्रीमती गंगाबाई बालक मंदिर कंधार या विद्येच्या मंदिरातून जवळपास ११००० विद्यार्थी घडवून मोठमोठ्या पदावरती कार्यरत असून ते वेगवेगळ्या पद्धतीने देशाची सेवा करत आहेत शिक्षक भगवान केंद्रे यांनी ज्ञानदानाच्या माध्यमातून त्यांनी अनेक विद्यार्थी घडविण्यात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांची ३७ वर्षाची प्रदीर्घ सेवा आज समाप्त होऊन ते कार्यमुक्त होत आहेत पुढील आयुष्यात अशीच त्यांच्याकडून सेवा घडत राहावी आणि त्यांना दीर्घायुष्य सुख समृद्धी लाभो असे ते म्हणाले.
भगवान केंद्रे हे वयोमानानुसार २ मे रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांचा सेवापूर्ती सोहळा संगमवाडी येथे साजरा करण्यात आला. विद्यार्थी ,पालक ,शिक्षक आणि प्रशासन यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवणे ,माणसे जोडणे ,विद्यार्थी घडवणे शैक्षणिक गुणवत्ता विद्यार्थ्यांना देऊन विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर करण्याचे काम त्यांनी ३७ वर्ष करून ते सेवानिवृत्त होत आहेत .
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्नाकर केंद्रे यांनी केले तर आभार भगवान केंद्रे यांनी मानले या सत्कार सोहळ्याला श्रीमती गंगामाता प्राथमिक शाळेचा शिक्षक स्टॉप, सरपंच, उपसरपंच, शालेय समिती, ग्रामपंचायत सदस्य, गावातील अनेक शिक्षण प्रेमी, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील नागरिक, महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नामदेव केंद्रे , कृष्णा केंद्रे ,माधव गोटमवाड,वाल्मीक केंद्रे ,विजय उगले, दीपक गुट्टे, अनिल केंद्रे ,प्रकाश जक्कलवाड, व भगवान बाबा मित्र मंडळ संगमवाडी यांनी परिश्रम घेतले