…… खरच असं असतं का ??…
मला जितकं वाचायला आवडतं त्याहीपेक्षा त्यातील बऱ्याच गोष्टी पटल्या की लगेच स्वतःमधे उतरवायलाही आवडतात.. प्रत्येक व्यक्ती , प्रत्येक क्षण , प्रत्येक गोष्ट ही आपल्याला भरभरुन देत असते पण बऱ्याचदा त्यावेळी जाणवतं , खरच असं असतं का हो ??.. की असे अपवाद असतात.. की अशा व्यक्ती किवा घटना स्पेशल असतात.. बदाम खाल्ल्यावर खरच बुध्दी वाढते का ??.. किवा मांसाहार करुन खरच ताकद येते का ??.. मग त्या शाकाहारी हत्तीचं काय जो सगळ्यात बलवान आहे.. असे अनेक प्रश्न पडतात तेव्हा जाणवतं की , अनेक गरीब घरात जन्मलेली मुलं हीच पुढे जाऊन मोठ्या पदावर काम करतात आणि कर्तृत्व गाजवतात.. सगळच विलक्षण आणि अनाकलनीय…..
डॉक्टर राज जाधव यांच्या बहारदार लेखणीतुन एक सुंदर कलाकृतीने जन्म घेतला आणि त्यांनी ते सुंदर पुस्तक त्यांच्या शुभहस्ते मला गिफ्ट दिले.. पुस्तके पाहिली की मी वेडी होतेच पण जेव्हा त्यांनी हे पुस्तक दिले तेव्हा त्यांना मी म्हटलं इतिहासात मी काठावर पास व्हायचे आणि तुम्ही मला ६८० पानाचं पुस्तक देताय .. बहिर्जी नाईक ह्या नावाने पुस्तक पाहिल्यावर मी मनात म्हटलं ,अरे यांच्याबद्दल मला जाणून घ्यायला मिळणार आहे यासारखे सुख ते काय असावे ना.. जेव्हा त्यांचं आणि माझं पॉडकास्ट संदर्भात बोलणं सुरु झालं तेव्हा मी त्यांच्याबद्द्ल फार काही विचारलं नव्हतं पण मी जेव्हा त्यांना भेटले तेव्हा त्यांचा साधेपणा , नम्रपणा आणि माझ्याबद्दल असलेला प्रचंड आदर पाहिला त्यावेळी मला जाणवलं ही व्यक्ती साधीसुधी नाही तर मोठी व्यक्ती असणार.. वय वर्षे फक्त ३० बरं का पण जी व्यक्ती मोठी असते तीच व्यक्ती दुसऱ्याचा आदर करते..
मी काल रात्रीच पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि त्या हातांच्या आणि बुध्दीमत्तेच्या प्रेमात पडले..
इतकं कोणी चांगलं लिहीतं का असं वाचताना अनेकदा वाटत आहे आणि पुढे वाटत राहिल कारण मी फक्त १०० च पानं वाचली आहेत आणि मला लिहायचा मोह आवरला नाही.. त्यातील आवडलेली वाक्य पेनाने अंडरलाईन करुन ठेवली आहेत कारण ती वाचताना जाणवलं , अरे नाही यार , हे असं कसं काय घडु शकतं??.. इतक्या गरीबीतुन जन्मलेले बहीर्जी यांच्या दंडात इतकी ताकद आली कुठून ??.. पेहलवान वडीलांचं रक्त की त्याच रक्ताने त्यांची झालेली पहिली आंघोळ?? वडीलांनी डुकराला मुंडकं पिरगळुन मारलं आणि यांनी भाल्याने लांडग्याला मारलं होतं..
अर्जुनाने झोपेवर विजय मिळवला होता म्हणुन त्याचं नाव गुडाकेश आहे तसच बहीर्जीना वाचताना जाणवलं की, त्यांना घोडा आवडतो कारण तो उभ्या उभ्या झोपतो , तेही २ तास झोपायचे .. थकायचे नाही .. थांबायचे नाही.. झोपायचे सुध्दा नाही अगदी जातिवंत घोड्यासारखे हे त्यांचे वाक्य वाचल्यावर मी विचार केला की आम्ही म्हणतो ७/८ तास झोप गरजेची आहे आणि मीही झोपते मग तेही माणूसच होते त्यांनी झोपेत इतके तास घालवले असते तर आपल्याला हा बहीर्जी वाचायलाच मिळाला नसता.. यातून जमलं तर एक गोष्ट कमी करायचा प्रयत्न मी करेन ती म्हणजे माझी प्रिय झोप ..
आईच्या दुधाचा एकही थेंब माझ्या ओठाला लागला नाहीहे वाक्य डोळ्यात पाणी आणतं आणि हाच माणूस पुढे जाऊन तलवारी , भाले यांच्याशी मैत्री करतो.. हाच माणूस गुप्तहेर होतो आणि ह्याच व्यक्तीबद्दल आपल्याला फार माहीत नाही ही शोकांतिका आहे..
गरीबीतुन जन्मलेले बहीर्जी यांच्या दंडात इतकी ताकद आली कुठून ??.. पेहलवान वडीलांचं रक्त की त्याच रक्ताने त्यांची झालेली पहिली आंघोळ?? वडीलांनी डुकराला मुंडकं पिरगळु
” काळ्याकुट्ट अंधारात एक जीव आपली यात्रा संपवून गेला होता आणि त्याच्याच पोटी निपजलेला दुसरा जीव आपली जीवनयात्रा सुरु करणार होता हे वाक्य म्हणजे डॉक्टर राज यांच्या हातावर सरस्वती नाचावी आणि आपण त्या नृत्याचा मनमुराद आस्वाद घ्यावा.. यातील काही वाक्यांची पारायणे करावीत इतकं देखणं लिखाण …त्यांनी काल माझ्या सौंदर्याची तारीफ केली पण त्यांच्याकडे असलेलं सौंदर्य कधीही कमी न होणारं आहे इतकच मला म्हणावं वाटतं..
या त्यांच्या ग्रंथाची पुजा करावी इतकं सुंदर काम त्यांच्या हातून घडलय.. बहीर्जीनी अनेक कला , अनेक भाषा आत्मसात केल्या त्यात अजून एक उल्लेख केलाय तो म्हणजे भगवदगीते आधी त्यांनी कुराण वाचलं होतं .. जेव्हा त्यांच्या आयुष्यात एक मुस्लीम व्यक्ती आली जी वैद्य होती त्यांची कला सुध्दा ते शिकले आणि आपण हिंदु मुस्लीम भेद करतो भेदभाव करण्याच्या नादात प्रत्येकाकडे असलेलं चांगलं आपण वेचत नाही ही आपली कमजोरी आहे.. ज्यांना मोठं व्हायचय ते सगळ्याकडुन चांगलं वेचत असतात म्हणुन ते स्पेशल असतात.. राज सर मनापासून कृतज्ञता व्यक्त करते कारण बहीर्जी कोण होते हे तुमच्यामुळे आम्हाला समजणार आहे..ol पुस्तक असेल जरुर वाचा आणि संग्रही ठेवा.. त्यांनी घेतलेली माझी मुलाखत लवकरच तुमच्यापर्यंत पोचेल.. राज सारख्या उत्तम माणसाना संधी मिळाली तर जरुर भेटा.. कारण चांगली माणसे संपर्कात यायला नशीब लागतं..
#SonalSachinGodbole
#Sonalcreations
#SexEducation
#Proudtobeatranswoman
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi