चामुंडा देवी म्हणजे पार्वतीचे रुप आहे.या देवीचे निवासस्थान म्हणजे स्मशान भुमीत वास्तव्यास राहते अशी अख्यायीका आहे.शिवकुंडलीनी जागरण करतेवेळी मदत करते.हिमाचल प्रदेशात चामुंडादेवीचे जवळपास 2000 मंदिरे आहेत.म्हणून हिमाचल प्रदेशाला चामुडादेवीची भूमी म्हणतात. असंख्य मंदिरे असल्यामुळेच हे एक आकर्षणाचे केंद्र आहे.ही चामुंडादेवी म्हणजे देशातील ५१ नारीशक्ती पिठापैकी एक मानले जाते.बंकर नदीच्या किनारी चांमुडादेवीचे भव्य मंदिर आहे.चामुंडादेवीची हजारो वर्ष जुनी जिवंत जयपुरच्या मंदिरातील मुर्ती सध्या आसाम येथील म्युझियम मध्ये आहे.हि मुर्ती ८ व्या शतकातील असा अंदाज आहे.ती एकाच दगडात सुरेख कोरलेली आहे.चामुंडादेवीची मुर्ती ही ध्यान साधना करतांना लीन आहे.हाडाचा नुसता ढाचा नसुन त्यावर शिल्पकारारांनी नस ना नस कोरली आहे.अशीच एक मुर्ती माझ्या
क्रांतिभुवन बहाद्दरपुरा नगरीत डाॅ.भाई केशवराव धोंडगे साहेब यांनी ही चामुंडा देवीची मुर्ती श्री व्दादशभुजा देवी मंदिर सर्वलोकाश्रय मंडपा शेजारी त्या मुर्तची प्राणप्रतिष्ठा केलेली अनेक दिवसांपासून पाहतो. तेंव्हा आम्ही या चामुंडा देवीच्या मुर्तीस राक्षसाची मुर्ती संबोधत होतो.ही मुर्ती म्हणजे चांमुडा देवीची आहे.आसामच्या म्युझियम मधील मुर्ती अन् माझ्या क्रांतिभुवन बहाद्दरपुर ता.कंधार येथील चांमुडा देवीची मुर्ती एकच पण शिल्पकाराच्या कल्पनेतून चामुंडा देवीची मुर्ती कोरीव काम वेगळे असेल पण चामुंडारुप एकच आहे.
आजही ही चामुंडारुप आपल्या माझ्या गावात पाहण्यास मिळेल.बहाद्दरपुरा या गावातील मुर्तीचा फोटो आमचे मित्र आदर्श शिक्षक गायक मा.सुनिल गवळे सरांनी लाॅकडाउन काळात शांतीघाटावर फेरफटका मारण्यास गेले असता चामुंडारुप आपल्या मोबाईलवर छायाचित्र सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार यांना उपलब्ध करुन दिल्याबद्दल सरांन धन्यवाद! आपल्या सर्वांना या चामुंडा देवी रुपाचा परीचय व्हावा या ऊद्देशाने हे लेखन…..
गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी,रा.क्रांतिभुवन बहाद्दरपूरा,ता.कंधार
सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार