दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्ताने , जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड येथे दिनांक: 21 मे 2024 रोजी. समितीचे पोलीस निरीक्षक श्री. विजय कुरील यांच्या उपस्थितीत कार्यालयात, दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ.
“आम्ही, भारताचे, नागरिक आपल्या देशाच्या अहिंसा व सहिष्णुतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून याद्वारे, सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा आमच्या सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याची गांभिर्यपूर्वक प्रतिज्ञा करत आहोत. आम्ही प्रतिज्ञा करतो की, आम्ही सर्व मानवजातीमध्ये शांती, सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकवू व वर्धिष्णू करू, तसेच मानवी जिवीत मूल्ये धोक्यात आणणाऱ्या विघटनकारी शक्तींचा प्रतिकार करू ” अशी शपथ कार्यालयात घेण्यात आली.
यावेळी,
मुकुंद मुळे, सिद्राम रणभीरकर, विठ्ठल आडे, साजिद हासमी, शिवाजी देशमुख, सोनू दरेगावकर, बाबू कांबळे, मनोज वाघमारे, ओमशिवा चिंचोलकर, राजेश मेथेवाड, सुनील पतंगे, अनिकेत वाघमारे यांनी उपस्थित होते.