कंधार (प्रतिनिधि) क्रांती वाहनचालक/मालक महासंघ यांच्या विद्यमाने कंधार चालक मालक ग्रुपने आपला हृद्य विकारांच्या तीव्र झटक्याने शेख आयुब शेख रसूल यांचे निधन झाले अन त्यांच्या कुटुंबावर मोठं संकट आलं. घरातील कर्ताधर्ता व्यक्ती अचानक मरण पावतो त्यांच्या कुटुंबावर मोठं आर्थिक संकट आलं आहे.आपल्या सहकाऱ्याच्या कुटुंबावर डोंगर कोसळला समजताच क्रांती वाहनचालक/मालक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ मामा बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली कंधारचे अध्यक्ष माधव अण्णा कांबळे आणि संघाने माणुसकी जपत याकुटुंबाला आर्थिक मदत म्हणून रोखरक्कम एक लाख १० हजार रक्कम त्यांच्या कुटुंबाला दिली आहे.
आपल्या सहकाऱ्याच्या कुटुंबातील कर्ता धरता कुटुंबाचा आर्थिक स्रोत बंद झाल्यास त्याच्या कुटुंबातील सदस्य कसे जगणार हा एक आपला भाग असून आपल्या परिवारातील सदस्यावर उपासमारीची वेळ यऊनये म्हणून कंधार तालुक्यातील सक्रिय चालक मालक एकत्र येऊन आपल्या परीने सर्वच चालक मालकांनी मयत शेख आयुब यांच्या कुटुंबाला मोठी आर्थिक मदत करून एक सामाजिक बांधिलकी अन माणुसकी दाखवली आहे.
या अगोदर याच संघाने कोरोनाच्या संकट काळात तालुक्यातील गरीब,गरजू वाहन चालकाला धान्य पुरविले तर अति गरिब चालकास आर्थिक मदत करीत संकट काळात माणुसकी धर्माचे पालन करीत गरजूंना आधार दिला. चालक/मालकावर अनेक संकटे अली या संकटकालीन परिस्थितीत कंधारच्या क्रांती वाहनचालक/मालक महासंघाने एकमेकांच्या मदतीने एकमेकांना जगण्याचा आधार दिला.
पोटाला भूकेचा जाच,चाके चालली तर घर चालवणारा वाहन चालक/मालकाला चिंता नसती. अचानक ऱ्हदय विकाराने कर्ता माणूस जेव्हा मरण पावतो तेव्हा त्या कुटुंबाची अवस्था काय असेल?.अशा मनस्थितीत असतानाच सामाजिक जाणीव असलेले जिव्हाळ्याची संस्था मदतीचा हात घेऊन पुन्हा पुन्हा पुढे येते आणि क्रांती वाहन चालक/मालक महासंघाने बुडत्याला काडीचा आधार देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे.