खरं तर प्रत्येकाने मोक्षाची अपेक्षा करायची असते आणि त्यानुसार आपलं कर्म करायचं असतं नाहीतर पुन्हा जन्म मृत्यू च्या चक्रात आपण अविरत अडकतो .. मीही अनेकदा म्हणते , मला मोक्ष हवाय पण माझं कर्म त्यायोग्य आहे का हे तो भगवंत ठरवेल पण तरीही आपल्या इच्छा मजबूत असतील तर मग अवघड आहे.. मग हे असं टायटल का दिलं असावं ना..
गेल्या वर्षी You made my evening या टायटलने एक आर्टीकल लिहीलं होतं तो दिवस कालचा होता.. अर्थात हे मी नेहमीप्रमाणे विसरले होते पण मित्राने आठवण करुन दिली.. माझ्या घराजवळ असलेल्या कट्ट्यावर म्हणजे गेल्या वर्षी जिथे बसलो तिथे बसुन माझं आवडीचं बटरस्कॉच आईस्क्रीम खायचे ठरले.. काल पावणेतीन तास आम्ही त्या पायऱ्यावर गप्पा मारत बसलो होतो.. मधेच २/३ वाचक माझ्याशी बोलुन गेले.. थंडगार वारं वहात होतं.. गेल्या वर्षी जिथे फोटो काढले तिथेच फोटो काढले.. फक्त गेल्या वर्षी पाऊस होता त्यामुळे काल आम्ही त्याची वाट पहात होतो.. पण काल बहुधा त्याची डेट दुसरीकडे होती. शेवटपर्यंत तो आलाच नाही..
मित्र मला म्हणत होता , सोनल आपण इथे बसलो होतो.. आपण हे हे बोललो होतो… मग आम्ही गेल्या वर्षीचे आर्टीकल ओपन केलं.. ते वाचलं.. आणि गार वाऱ्यावर मित्रासोबतची निस्वार्थ डेट एंजॉय केली.. मी अनेकदा अनेक लोकांना भेटते .. त्यातील काही अनेक वर्षे सोबत रहातात आणि काही ठरावीक काळासाठी सोबत असतात.. काही लोकांना पुन्हा भेटावं वाटतं .. तर काही कधीही भेटु नयेत असं होतं.. मला कायमच वैचारिक लेव्हल उच्च असलेल्या लोकांना भेटायला आवडतं.. त्याच्याकडे पैसे किती आहेत किवा गाडी कुठली आहे याने मला कधीही फरक पडला नाही.. अनेक पुरूष मित्रांमधे असतानाही त्यांचा कधीही त्रास झाला नाही आणि घरी सगळे मित्र माहीत असल्याने घरात खोटं बोलावं लागत नाही.
. निखळ मैत्री कशी असावी ही बियॉन्ड सेक्स मधे मिरा सागर ने सांगितलीच पण प्रत्येक क्षण फिरुन नव्याने जगताना राधा कृष्ण कायमच समोर येतात.. स्त्रीला पुरुष मित्र हवेतच नाहीतर तिला नवरा कळणार नाही.. पुरूष वाईट असं मुलींच्या मनावर बिंबवु नका नाहीतर त्या जिवंत रहातील पण जगू शकणार नाहीत.. त्याउलट मुलगा आणि मुलगी यांच्या ॲनाटॉमी , विचारसरणी ,,मानसिकता यात काय फरक असतो हे मुलीना समजून द्या. माझ्याकडे काउंसीलींग ला जेव्हा मंडळी येतात तेव्हा त्यांना पुरूषच समजलेला नसतो आणि त्यामुळे अडचणी निर्माण होतात.
एक व्यक्ती सगळ्या गोष्टी देउ शकत नाही त्यामुळेच मीही सचिनवर रुसत नाही कारण तो मनवु शकत नाही पण कधीकधी मित्रासोबत रुसते कारण तो मनवतो.. आपल्या गरजा आणि समोरच्याची कपॅसिटी याचा ताळमेळ साधता आला तर जीवन सुखकर आहे .. आपण स्वतः एकटे स्वतः ला आनंदी ठेवु शकत नाही पण इच्छा दाबून आपण आनंदी असल्याचा भास निर्माण करु शकतो.. आपल्या आनंदासाठी कोणी ना कोणी जबाबदार असतच.. म्हणुन मित्र असायलाच हवेत .. ते कसे असावेत हे आपले विचार ठरवतात ..
रोज नव्याने जगत रहा आणि कायम आनंदी रहा.. आपल्याला कायम आनंदी पाहून अनेकजण आनंदी राहु शकतात..
#SonalSachinGodbole
#Sonalcreations
#SexEducation
#Proudtobeatranswoman
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi
#Abhisarika
#counseller
#Nutritionist