कंधार ; मन्याड थडीचेच नव्हे तर महाराष्ट्र राज्यातले शिक्षण महर्षि डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांनी आपले सहकारी व श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार या संस्थेचे सचिव माजी आमदार भाई गुरुनाथरावरावजी कुरुडे साहेब व असंख्य शैक्षणिक चळवळीतले तळमळीचे सहकारी सोबतीला घेत १९४८ च्या शिवजयंतीस मौजे गऊळ ता.कंधार या आपल्या आजोळात मातोश्री मुक्ताई यांच्या सूचनेनुसार श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार यांची सुरुवात केली.पहाता-पहाता संस्थेनी अमृत महोत्सवी वर्षाचा पल्ला गाठला.नुकत्याच झालेल्या माध्यमिक बोर्ड परीक्षेचा निकाल लागुन मन्याड खोर्यातील अव्वल गुणवत्तापूर्ण यशाची परंपरा यंदाही श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार संस्थेतील १६ जुन १९५३ रोजी मोफत मातृशाखा श्री शिवाजी हायस्कूल हु.माणिकराव काळे रोब कंधार या ज्ञानालयाने आपली गुणवंताची परंपरा कायम ठेवली.त्या बद्दल श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार संस्थेचे अध्यक्ष प्रा.डाॅ.भाई पुरुषोत्तम केशवरावजी धोंडगे साहेब आणि सहसचिव अँड मुक्तेश्वर केशवरावजी धोंडगे साहेब आपल्या वडीलांनी मन्याड खोर्यात शैक्षणिक क्रांतिचे बीजारोपण केले.त्याचे वटवृक्षात रुपांतर झाले.त्यांचे नियोजनबद्ध कार्य करण्याचा जणू विडाच उचलला.
सत्कार कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या परंपरेनुसार वंदेमातरम गीताने सुरुवात होवून संस्थेचा आत्मा ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी खासदार व आमदार, विद्रोही विचारवंत डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या तैलचित्रास व जगतज्योती म.बसवेश्वर महाराज आणि समाजसुधारक म.ज्योतीराव फुले यांच्या अर्ध पुतळ्यास माल्यार्पण करुन सुरुवात झाली.
हा निकाल खालील प्रमाणे कंधार व लोहा तालुक्यात सर्वप्रथम येण्याचा सन्मान पटकाविला.विज्ञान सेमी आणि इतिहास-भुगोल या दोन्हीही विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून श्री शिवाजी हायस्कूल हु.माणिकराव काळे रोड कंधार या ज्ञानालयाच्या प्रतिष्ठेला चार चांद
प्रथम येणाऱ्या कु भागानगरे संयोगिता संजय-गुण १००% मिळवत यशाला गवसणी घातली.कु. शेख शरमीन फारुख-गुण ९८.४०% कु. नायकवाडे धनश्री रामकिशन-गुण ९८.२०% ,कु.अंसारी अलीना फातिमा म. मुनीर मोहम्मद-गुण ९६.४०% ,गुट्टे व्यंकटेश संजय-गुण ९६.४०% ,कु. शेख शिरीन फातिमा शहजाद-गुण ९६.००%,येइलवाड रुशिकेश आनंद-गुण ९५.८०%
केंद्रे प्रसाद गोविंद-घुण ९५.२०%,भायेगावे नागेश गोविंद-गुण-९५.००. शाळेचे ३९ विद्यार्थी ९०% च्या वर गुण घेऊन यशस्वी झाले.शाळेतून शालांत प्रमाणपत्र परीक्षेत ३०९ विद्यार्थ्यानी दिली.त्या पैकी ३०३ उत्तीर्ण
झाले.शाळेचा निकाल एकुण ९८.०५% लागला.
गुणवंत विद्यार्यांचे अभिनंदन संस्था सचिव माजी आमदार भाई गुरुनाथरावरावजी कुरुडे साहेब, संस्थाध्यक्ष प्रा.डाॅ.भाई पुरुषोत्तम केशवरावजी धोंडगे साहेब,संस्था सहसचिव अँड मुक्तेश्वर केशवरावजी धोंडगे या सर्व यशस्वी गुणवंताना मानाची जयक्रांति करुन अभिनंदन केले.सत्कार समारंभ मातोश्री मुक्ताई धोंडगे सांस्कृतिक कला मंडपात करण्यात आला.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान श्री शिवाजी हायस्कूल हु.माणिकराव काळे रोड कंधार या शाळेत शालेय समिती अध्यक्षा प्रा लिलाताई आंबटवाड मॅडम व मुख्याध्यापक सदाशिवराव आंबटवाड सर यांच्या समर्थ हस्ते करण्यात आला.
या समयी शाळेचे उपमुख्याध्यापक अनिल जाधव सर,पर्यवेक्षक आनंदराव पा. भोसले सर,शालेय समिती सदस्य आदर्श इंग्रजी विषयाचे शिक्षक वैभव कुरुडे सर,सेमी विभागाचा कणा अजहर बेग सर, ओएस पंडितराव लाडेकर सर,सांस्कृतिक विभागाचे संजय कदम सर,लिपिक चमकले सर,गुणवंताचे पालक संजय भागानगरे उपस्थित होते.