आज बाबा असते तर,या चिमुकलीच्या यशाने ते नक्कीच भारावले असते!प्रा.डाॅ.भाई पुरुषोत्तम धोंडगे

कंधार ; 
कंधार म्हणटले की,आठवते फक्त मन्याड खोरे या मन्याड खोर्‍यात ७६ वर्षापूर्वी गऊळ नगरीत श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली.गवंडीपार येथे जयराम राहटे यांच्या वाड्यात श्री शिवाजी मोफत हायस्कूल दि.१६ जुन १९५३ रोजी सुरु केले.त्या रोपट्याचे रुपांतर श्री शिवाजी हायस्कूल हु.माणिकराव काळे रोड कंधार या ज्ञानालय वटवृक्ष झाले.कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या रितीनुसार वंदेमातरम गीताने होऊन ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांना आदरांजलि अर्पण करण्यात आली.पहिल्या प्रथम सामाजिक बांधिलकीतून मानवता धर्म जपत भाऊचा डबा नाबाद ११०० दिवस व एका आठवड्यात ६० गावात,कंधार-लोहा शहरात रेकॉर्डब्रेक नेत्र तपासणी केल्या बद्दल प्रा.डाॅ.भाई पुरुषोत्तमजी भाऊ धोंडगे साहेब यांचा ह्रदय सत्कार मुख्याध्यापक सदाशिवराव आंबटवाड सर, उपमुख्याध्यापक अनिल जाधव सर,ज्युनियर कॉलेज प्रमुख प्रा.मुरलीधर घोरबांड सर,पर्यवेक्षक आनंदराव पाटील भोसले सर यांचे समर्थ हस्ते करण्यात आले.

यंदाच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत कु.संयोगीता संजय भागानगरे हीने कंधार व लोहा-कंधार तालुक्यात सर्वप्रथम येण्याची किमया साधली.या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रा.डाॅ.भाई पुरुषोत्तमजी धोंडगे यांचे समर्थ हस्ते गुणवंत विद्यार्थीनी कु.संयोगीता भागानगरे,तिची आई सौ.भागानगरे ताई आणि वडील संजय भागानगरे तिघांचाही यथोचित सत्कार केला.गुणवंताच्या सत्कार केला.प्रास्ताविक मुख्याध्यापक सदाशिवराव आंबटवाड सर केले.संस्थेचे अध्यक्ष प्रा.डाॅ.भाई पुरुषोत्तम भाऊ धोंडगे साहेब आपले मनोगत व्यक्त करतांना माय संयोगीता तुझे नाव जसे अवघड आहे,तसेच तु कामही मेहनत घेऊन केले.१००% गुण मिळवून संस्थेचा, शाळेचा, मातापित्याचा नावलौकिक वाढविला आहेस.माझे बाबा आज असते तर, त्यांना खुप आनंद झाला असता.वाडी-तांडे,नाहिरेवाले,पोतराज, दीन-दुबळे,सुग्या-मुग्या,सालदार राजे यांच्या लेकरांनी परीक्षेत यश मिळवताच अक्षरशः ते आनंद व्यक्त करत होते.

कारण बाबांचे लक्ष या संस्थेच्या पहिल्या मातृशाखेवर जास्त होते.कोरोणा काळानंतर दररोज या शाळेला भेट देत होते.कु संयोगीताच्या माता-पित्याचे अभिनंदन तोंडभरून कौतुक केले.कार्यक्रमा प्रसंगी प्रा.अशोक वरपडे सर,अजहर बेग सर,पंडित लाडेकर सर,गोविंद अन्नकाडे,ज्ञानोबा कुरे,प्रकाश पवार सर,पत्रकार जमीर बेग सर, संग्राम जाधव सर,विठ्ठल मोरे सर, लिपीक चोकले सर,चिवडे सर,केदार पटणे सर, राजू लुंगारे, मन्मथ पेठकर मामा, उल्हास राठोड मामा,चंद्रकांत मोरे मामा,अभंग लोखंडे,ठाकुर आदीजण उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ज्युनियर विभागाचे उपप्राचार्य प्रा.मुरलीधर घोरबांड सरांनी केले,तर सुत्रसंचलन गोपाळसुत दत्तात्रय एमेकर यांनी मानले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *