काल संध्याकाळी आम्ही इस्कॉन मंदिर कोंढवा येथे गेलो होतो.. अतिशय सुंदर हवा आणि भगवंताच्या दारात उभ्या असलेल्या गोमाता पाहून मन प्रसन्न झालं.. गोमातेचे दर्शन घेउन आम्ही मंदिरात गेलो.. मस्त आरती सुरु होती.. हरे कृष्ण महामंत्राने वातावरण भारुन गेले होते.. भक्त दंग होवुन नाचत होते.. आजकाल यंग जनरेशन मंदिरात जाते पाहून नक्कीच आनंद होतो.. कालही बऱ्याच मुली मुलं मंदिरात होती .. आम्ही दर्शन घेउन बाहेर आलो आणि मंदिराच्या आवारात असलेलं दृश्य पाहून अवाक झालो..
साधारणपणे २०/२५ वयोगटातील २ मुली मंदिराच्या आवारात एकमेकींना शिव्या देत एकमेकांवर तुटून पडल्या होत्या.. गळ्यात दोघीच्याही माळ होती.. मंदिरात आरती करुन महानंत्र म्हणुन किवा रोज जप करुन कोणीही संत होत नाही हे त्या दोन मुलीनी सिध्द केलं.. वाल्याचा वाल्मिकी व्हायला स्पेशल क्वॉलीटी असायला हवी आणि ती फक्त एकाकडेच असते.. भगवंताने भगवद्गीतेमधे इंद्रीयांवर ताबा कसा मिळवायचा आणि दिव्य ज्ञानाद्वारे आपली प्रगती कशी करुन घ्यायची हे सांगितले आहे पण बऱ्याचदा हे चित्र उलट दिसतं.. गळ्यात माळ घातलेली मंडळी माळ काढून मांसाहार करतात किवा खोटं वागतात.. मग माळ घालूच नका ना.. शेवटी आपल्या कर्मानुसार आपल्याला फळं मिळणार आहेतच ..
शास्त्र समजून घ्यायला आणि काही गोष्टी सोडायला वेगळी क्वॉलीटी लागते.. त्यासाठी मानसिक आरोग्य कसं आहे किवा मानसिक जडणघडण कशी आहे आणि आपण कुठल्या वातावरणात रहातो हे महत्वाचे आहे म्हणुन सत्संग हवा.. सुसंगती सदा घडो .. सृजन वाक्य कानी पडो.. मांसाहाराने माणूस रागीट होतो हे त्रिकालाबाधित सत्य आहे..तरीही या गोष्टी सुटत नाहीत..
अजून एक मंदिरातील कालचीच घटना सांगते.. आम्ही जप करत बसलो होतो .. माझ्या समोर एक माताजी जप करत होत्या.. त्या पहिल्यांदाच जप करत होत्या आणि त्यांच्या शेजारी प्रभुजी म्हणजे त्यांचे पती हे रुक्ष चेहरा करुन बसले होते.. अगदी जबरदस्तीने मंदिरात आल्यासारखे ते दिसत होते.. मी त्यांना म्हटलं , भगवंताचं नाव घ्या.. जप केला का विचारलं तर नाही म्हणाले आणि तिथून निघून गेले.. ज्याने या सृष्टीची निर्मिती केली ज्याच्यामुळे आपण आहोत त्याचं साधं नावही आपल्या मुखात येवु नये यासारखे करंटे फक्त आपणच.. संकट आलं की आपण देवाचा धावा करतो आणि जेव्हा सगळं सुरळीत असतं तेव्हा आपण त्याची कृतज्ञताही व्यक्त करु शकत नाही..
मंदिरात कधीही काहीही मागायला जायचे नसते तर त्याने जे दिलय त्यामुळे त्याची कृतज्ञता व्यक्त करायला जायचे असते. मुलांच्या नावावर प्रॉपर्टी ठेवताना आपण त्याच्यावर चांगले संस्कार करतोय का याचा विचार व्हायला हवा.. नाहीतर त्या पोर्शे गाडीच्या कुटुंबासारखी अवस्था व्हायला वेळ लागत नाही… चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याकडे आपला कल नसून वाईट गोष्टी स्विकारण्याकडे आपला कल दिसतो..
कारण बाहेर दिसत असलेला भुलभुलैय्या .. जे क्षणीक आहे त्याच्या मागे आपण लागतो आणि जे शाश्वत आहे ते दुर्लक्षित करतो.. तरुण पिढी मंदिरात जाऊनही जर अशी वागत असेल तर पालकांनी काय पध्दतीचे विचार त्यांना देणं गरजेचे आहे यावर सीरीयस विचार व्हावा.. टिळा लावून संत न होता विचाराने संत बनणं गरजेचे आहे..
#SonalSachinGodbole
#Sonalcreations
#SexEducation
#Proudtobeatranswoman
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi
#Abhisarika
#counseller
#Nutritionist