शाळा म्हणजे समाजाची प्रतिकृती..!

 

 

आज शाळेचा पहिला दिवस दरवर्षी शाळा 15 जूनला सुरू होतात. त्यामुळे शाळेत जाण्यासाठी मुले उत्सुक असतात. नवे वर्ग, नवे मित्र, मैत्रिणी, नवे पुस्तके, नवा गणवेश, नवीन बॅग, नवे शूज सर्व काही नवे नवे यामुळे मुलांच्या आनंदाला पारावर उरत नाही. प्रदीर्घ सुट्टी उपभोगून मुले आपापल्या विद्यालयात दाखल होतात. काही मित्र-मैत्रिणी आई-वडिलांच्या बदलीच्या निमित्ताने विद्यालय सोडून दुसरीकडे प्रवेश घेतात. त्यामुळे त्यांचा सहवास मिळत नाही
मनाला हुरहुर लागते. काही इतर कारणाने शाळेत विद्यार्थी येऊ शकत नाहीत. त्यामुळे मन उदासीन होते. सर्व सवंगडी एकत्रित येऊन केलेली शाळा वेगळीच असते. शाळेत संस्कार शिकविले जातात ते आयुष्यभर आपणाला बांधून ठेवतात. म्हणून शाळा ही संस्काराची विद्यापीठ असते. शाळेत अनेक जाती- धर्माचे मित्र मैत्रिणी मिळतात. त्यांना जात-पात सुद्धा कळत नसते, सर्वजण आपण एक आहोत ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते ही किमया शाळेची असते. शाळा सर्वांना सारखा न्याय देते,म्हणून शाळेला विद्यामंदिर ही म्हणतात. प्रत्येक व्यक्ती शाळेतून शिकून मोठा होतो, अनेक वर्षे तो शाळेत गेलेला असतो, त्याला आज जरी मोठी नोकरी लागली तरी तो शाळा विसरत नाही. गावापासून दूर नोकरीसाठी गेलेली व्यक्ती गावाची आठवण काढताना शाळेची विचारपूस हमखास करतात.शाळेने अनेकांना मोठे केले.भेदभाव काढून टाकले. अंगत पंगत करून जेवण दिले. खेळताना धमाल केली. वर्गातील शिस्तीमुळे अनेकांना आयुष्याची शिस्त लागली .संस्काराचे धडे मिळाले. छडी लागल्यामुळे विद्येचे महत्त्व कळाले. छडीमुळे आम्ही आज स्वतःच्या पायावर उभे राहिलो,शिक्षा झाली. म्हणून आम्ही आज अधिकारी आहोत. गुरुजींनी शिक्षा केली नसती तर आम्ही आज रिकामटेकडे राहिलो असतो, असे अनेक जण प्रांजळपणे चार- चौघात सांगतात. हे सांगताना त्यांना थोडाही कमीपणा वाटत नाही, म्हणून गुरुजींनी शिस्त लावून शिक्षा केली हे त्याकाळी फार चांगले झाले.गुरुजींनी शिक्षा केले म्हणून घरातील लोकांना ही सांगता येत नसत, सांगितले तर घरी सुद्धा मार खाण्याची वेळ येत असे, म्हणून अभ्यास केल्याशिवाय पर्याय नव्हता, पाढे, पाठांतर करावे लागत होते. शब्दार्थ, सूत्र ,पाठांतर करून वर्गात बसावे लागत होते, नाहीतर वेताची छडी असायची. टेबलावर हात ठेवून गुपचूप उभे राहावे लागत असे.शाळेचा पहिला दिवस आजही मला आठवतो, काही मुले रडत रडत येतात, पण शाळा शिकतात.ते दिवस कोणीही विसरू शकत नाहीत. प्रत्येक आईला आपला मुलगा शिक्षण शिकावा, मोठा व्हावा असे वाटत असते, म्हणून ती मुलांना शाळेत आणून सोडते, जे शाळेत मार खाऊन शिकले ते समाजाच्या प्रवाहात उतरले. जे शिकले नाहीत त्यांना शाळेची आठवण पुन्हा पुन्हा येते. केलेल्या चुका हमखास आठवतात इतरांकडे पाहून शाळेचे स्मरण होते. *गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी* असे म्हणावे लागते. ज्येष्ठ समाज सुधारक अण्णा हजारे म्हणतात ” मी घरी गृहपाठ केलो नव्हतो आणि शाळेत खोटे बोललो, वही घरी राहिली, असे गुरुजींना सांगितले. गुरुजी म्हणाले “जा ? घरी जाऊन गृहपाठाची वही घेऊन परत शाळेत ये,” तेव्हा मी घरी गेलो,आईला खरे सांगितले.तेव्हा आई सुद्धा माझ्या सोबत शाळेत आली. त्यानंतर माझी कशीबशी सुटका झाली असे दिलखुलासपणे ते त्यांच्या आत्मचरित्रात लिहितात.शाळेने संस्कार व नीतिमत्ता शिकविले.

 

शाळेचा पहिला दिवस मानवाच्या जीवनातील अविस्मरणीय क्षण असतो, तो मानवाला धर्म, तत्वे, नीती, न्याय ,संस्कार सर्व काही शिकवते, शाळा पत्र्याची असो की, दगडांची असो त्या शाळेत शिकवणारे शिक्षक मुलांना संस्कार देतात.
प्रत्येक शाळेत योग्य ज्ञान मिळते ते ज्ञान आपण कसे आत्मसात करतो, यावर बरेच काही अवलंबून आहे. शाळेला कोणीही दोष देऊ नये. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे शाळेत फक्त दोनच दिवस गेले आणि एवढे प्रचंड लोकसाहित्य लिहून काढले हे मुद्दाम येथे नमूद करावे वाटते. कारण शाळेनी त्यांना घडविले. त्यामुळे शाळा हे एक ज्ञानरूपी सरिता आहे.

7 नोव्हेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शाळेत गेले. तो त्यांचा पहिला दिवस होता, तो दिवस आज भारतभर विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जात आहे.
म्हणून शाळेला ज्ञानाचे भांडार म्हणतात. तसेच शाळेला विद्यार्थ्याचे दुसरे घर ही म्हणतात. शाळेत मित्र, मैत्रिणी, शिक्षक असतात. शाळा म्हणजे समाजाची प्रतिकृती होय. शाळेत मुलांचा भावनिक, बौद्धिक, मानसिक विकास होतो. कोमल बाल मनावर अनेक संस्कार विद्यालयात केले जातात. प्रत्येक मुलाची आवड वेगळी असते, त्यामुळे ते शिकतात गुरुवर्य रवींद्रनाथ टागोरांनी सर्व बालके एकत्रित करून शांतिनिकेतन ही शाळा सुरू केली म्हणून शाळेला एक संस्कार सरिता आपण म्हणूया! काळानुसार शिक्षण बदलत आहे म्हणून शाळेचा पहिला दिवस आज अतिशय आनंदाने घालूया! शाळेच्या पहिल्या दिवसाला खूप खूप शुभेच्छा.

 

*शब्दांकन*
*प्रा.बरसमवाड विठ्ठल गणपत* अध्यक्ष: विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता.मुखेड जि.नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *