मुखेड: (दादाराव आगलावे)
आपला देश ही जगातली 5 वी महासत्ता आहे, आणि लवकरच आपण तिसऱ्या क्रमांकावर जाणार मात्र त्यासाठी युवा पिढीला आर्टिफिशियल इंटेलिजेंस, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, फ्रीलासिंग सारख्या नवीन तंत्रज्ञानासाठी स्वतःला तयार करावे लागेल. असे प्रतिपादन एम के सी एल चे डेप्युटी जनरल मॅनेजर डॉ. दीपक पाटेकर यांनी केले.यथील कै. गोविंदराव राठोड सांस्कृतिक सभागृह येथे ‘तंत्रज्ञानातील नवीन वाटा’ या विषयाचे मार्गदर्शन शिबिर पार पडले यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.शिबिरास दहावी ,बारावी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त उदंड प्रतिसाद लाभला होता.
विद्यार्थ्यांना डॉ.दिपक पाटेकर यांनी येणाऱ्या काळातील नोकरी विषयी होणाऱ्या अडचणी बद्दल सविस्तर मार्गदर्शन करत नवीन शैक्षणिक धोरणात झालेले बदल व तंत्रज्ञानामध्ये होत असलेल्या क्रांती आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, रोबोटिक्स, बिग डेटा आदिच्या माध्यमातून निर्माण झालेले नवीन करियर्स, नोकऱ्यांची माहिती देत विद्यार्थ्यांना ही करिअर आत्मसात करण्यासाठी आवश्यक कौशल्य आत्मसात करण्यासाठी एमकेसीएल मार्फत एमएस-सीआयटी केंद्रावर उपलब्ध झालेल्या वेगवेगळ्या क्लिक अभ्यासक्रमाची माहिती दिली. स्वतः आपण घरबसल्या विविध ॲप्स बनवणे , वेबसाईट बनवणे, फ्री लान्सिंग च्या माध्यमातून अकाउंटंट , इतर अनेक ऑनलाईन कामे करून विद्यार्थ्यांना घरबसल्या पन्नास ते एक लाखापर्यंत पगार कसे कमवता येते याचे
पण मार्गदर्शन दिपक पाटेकर यांनी केले.
महाराष्ट्र शासनाने शासनाच्या सारथी मंडळाकडून महाराष्ट्रातील मराठा, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना मोफतचा सहा महिन्याचा सीएसएमएस डीप संगणक डिप्लोमा अभ्यासक्रम एमकेसीएल मार्फत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. ज्यामध्ये चार मॉड्युल आहेत. पहिला इंग्लिश स्पीकिंग स्किल्स, दुसरा आयटी स्किल्स, तिसऱ्या व चौथ्या मॉड्युल मध्ये विद्यार्थ्यांच्या संगणक क्षेत्रातील करिअरच्या आवडी निवडीनुसार निवडण्यासाठी १२ कोर्ससचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी ‘सारथी’ योजनेचा आवर्जून लाभ घ्यावा व स्वतःच्या पायावर उभे राहून सन्मान जनक नोकरी किंवा व्यवसाय करावा व आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी असे आव्हान डॉ. दिपक पाटेकर यांनी केले
या शिबीराचे आयोजन मुखेड तालुक्यातील अधिकृत एम एस सी आय टी केंद्रांनी केले होते. या शिबिरात मुखेड व नायगांव तालुक्यातील 10 वी आणि 12 वीच्या तब्बल 900 विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला. या शिबिरात त्यांनी पुढील 20 वर्षात तंत्रज्ञान क्षेत्रात होणारे बदल, आणि नवीन शैक्षणीक धोरण या विषयावर प्रतिपादन केले, त्यांनी आत्ताच्या युवा पिढीला कौशल्य पूर्ण होण्यासाठी पुढे या आणि तुम्ही आधी सुरुवात करा असे आव्हान केले, कारण जग त्यालाच ओळखते जो प्रथम सुरुवात करतो, तुम्ही नौकरी करणारे नाही तर नौकरी देणारे बना. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे एम के सी एल चे असिस्टंट रिजनल मॅनेजर जीवन लेंभे आणि अध्यक्ष एम के सी एल चे जिल्हा समन्वयक पांढरीनाथ आघाव होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जोशी इन्फोटेक चे संचालक जय जोशी यांनी केले तर आभार आय सी टी कम्प्युटर चे गजानन गेडेवाड यांनी मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. मनीषा जोशी यांनी केले. यावेळी कैलास माधसवाड, पवन शिरबरतळ, अमित घोडके, शेख वाजीद, मोमीन, अखिल सय्यद, मुकेश अडचीत्रे, सौ. पांडे, हणमंते किरण, दिगंबर वल्हे, अडकिने यांची उपस्थिती होती.