मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मास्कचे वाटप ;शिवसेना शाखेच्या उपक्रम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मास्कचे वाटप ;शिवसेना शाखेच्या उपक्रम


अहमदपुर(बालाजी काळे)
 तालुक्यातील उजना येथील शिवसेना शाखेच्या वतिने मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उजना येथील ग्रामस्थांना शिवसेना उपजिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. जगभरात कोविड-१९ (कोरोना) ने धुमाकुळ घातला असुन दिवसेंनदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. शहरीभागांसह ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केला असुन यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणुण सरकारणे सार्वजनिक ठिकाणी फिरतातना मास्क घालने नागरीकांना बंधनकारक केले आहे. याच पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे अौचित्य साधुन शिवसेना नेते जिल्हाउपप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या सुचनेनुसार उजना शिवसेना शाखेचे प्रमुख लहु बारवाड यांच्या वतिने मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *