खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसा निमित्त शिरूर येथे वृक्षारोपण
कंधार :
सध्या जगभर आसह नांदेड जिल्ह्यातील कोरणा या महाभयंकर रोगामुळे नागरिक व शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला असून अशा संकटकाळात नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार शप्रतापराव पाटील चिखलीकर हे वाढदिवसानिमित्त कोणतेही कार्यक्रम घेणार नाहीत आणि वाढदिवस साजरा करणार नाहीत त्यामुळे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी तसेच महिला आघाडीच्या वतीने कंधार तालुक्यातील शिरूर येथे पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी तसेच प्रत्येक नागरिकांनी एका झाडाचे संगोपन करून ते झाड जगवण्यासाठी महिला आघाडीच्या वतीने भारतीय जनता पक्षाचे नांदेड लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. चित्ररेखाताई गोरे यांच्या नेतृत्वाखाली सौ. सरोजनीताई शिंदे भाजपा तालुका सरचिटणीस कंधार यांच्या वतीने शिरूर येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास सौ हऱ्याबाई वडजे. सौ.लक्ष्मीबाई शिंदे सौ.शशिकलाबाई शिंदे सौ.रुक्मीनबाई जाधव सौ.मुक्ताबाई शिंदे सौ.कुसुमबाई शिंदे.सौ पद्मावतीबाई.वडजे सौ.राधाबाई जाधव सौ.महानंदाबाई नवघरे सौ.केराबाई वाघमारे सौ.निलावती नवघरे सौ.प्रतिभा नवघरे या सर्व महिलां आघाडीच्या वतीने वृक्षारोपण करून खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना उदंड आयुष्य लाभावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन सौ. सरोजनीताई शिंदे महिला आघाडी भाजपा कंधार तालुका सरचिटणीस यांनी केला होता या कार्यक्रमास गावातील शेकडो महिलांनी सहभाग घेऊन वृक्ष रोपण करण्यात आले.Attachments area