शेतकऱ्यांच्या दुध प्रश्नावर अहमदपुरात भाजपचे रास्तारोको आंदोलन.

शेतकऱ्यांच्या दुध प्रश्नावर अहमदपुरात भाजपचे रास्तारोको आंदोलन.  


     अहमदपूर(बालाजी काळे)    


                शेतकऱ्यांच्या दुध प्रश्नावर अहमदपुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज सकाळी अकरा वाजता भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या वतीने भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सदस्य तथा माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन करून मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांना देण्यात आले.                      येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बसस्थानका समोर आंदोलनांच्या सुरूवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धअभिषेक‌‌ माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तद्नंतर रस्तारोको आंदोलन  करून निष्क्रीय महाराष्ट्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.                          .            सध्या शेतकरी अडचणीत सापडला आहे त्यातच दुध उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला असल्याने दुध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 10 रुपये अनुदान देण्यात यावे,दुध भुकटी निर्यातीला प्रति किलो 50 रुपये अनुदान द्यावे, गाईचा दुध खरेदी दर प्रति लिटर 30 रुपयांनी करावा, अहमदपुर शहरातील चालू असलेली शासकीय दुध डेअरी बंद करून दुसऱ्या गावाला स्थलांतरीत केली आहे स्थलांतरीत दुध डेअरी रद्द करून पुर्वरत अहमदपुर शहरात‌ चालू करण्यात यावी अशा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ‌रास्तारोको आंदोलन करून उपजिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.  सदरील आंदोलनात भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सदस्य माजी मंत्री विनायकराव पाटील, भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके ,शरद जोशी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष महेश ढाकणे, माजी जिल्हा परिषद सदस्य देवानंद मुळे, अॅड. अमित रेड्डी, हणमंत देवकते,पंचायत समितीचे उपसभापती बालाजी गुट्टे,सदस्य रामभाऊ नरवटे, राजकुमार खंदाडे, व्यंकटी जाभाडे, गोविंदराव गिरी, डॉ.सिद्धार्थकुमार सुर्यवंशी,लक्ष्मीकांत कासनाळे, राहूल शिवपुजे, निखिल कासनाळे, सुधीर गोरटे, देवीदास सुरणर,यतीराज केंद्रे, संजीव मुसळे,प्रताप पाटील, महेश बिलापट्टे,श्रीकांत शर्मा,हरीराम गुट्टे, हेमंत गुट्टे, आनंद गुट्टे,हरिश्चंद्र बलशेटवार , शिवानंद भोसले, गणेश कापसे, चोले शिवदास,शुकूर जागीरदार, सौ.गयाबाई सिरसाठ, जयश्री  केन्द्रे,आनंद देवकते, सुभाष सोनकांबळे, परमेश्वर पाटील, संतोष कोटलवार, शंकर मुळे, बबनराव नवटक्के, विष्णु पौळ, शिवराज चोथवे,ज्ञानोबा जायभाऐ यांच्या सह भारतीय जनता पक्षाचे व महायुतील घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सोशल डिस्टनसिंग पाळुन यावेळी उपस्थित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *