अँर्सेबिक ३०रोगप्रतिकारक औषधाचे वाटप करुन कंधार शहरात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची शताब्दी जयंती साजरी
कंधार ; डॉ.माधव कुद्रे
देशात कोरोणामुळे सर्वत्र सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करण्यावर शासनाने बंधन टाकले असून शासनाच्या नियमाचे पालन करत कंधार येथिल लहुजी नगर येथे अॉर्सेबिक थर्टी या रोग प्रतिकार वाढवणाऱ्या गोळ्या देऊन शताब्दी वर्षानिमित्त शंभर कुटुंबियांना गोळ्याची वाटप करून अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमात ध्वजारोहण मामा मित्र मंडळाचे संस्थापक मारोतीमामा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नामदेव घोडजकर,तरप्रमुख पाहुणे म्हणून राजहंस शहापुरे, डी,जी, वाघमारे , फुले, सोपान कांबळे, धनाजी वाघमारे , सदाशिव गायकवाड , संभाजी देवकांबळे, बापुराव बारुळकर,भगवान रेडे , तानाजी बसवंते, अशोक बसवंते, दयानंद गडंबे,अमरकुमार बसवंते ,पद्माकर बसवंते,किशोर बारुळकर,सचिन बसवंते,कैलास नवघरे ,राजु सुर्यवंशी,शंतनूभाऊ कदम,भास्कर कदम ,कपिल वाघदरे, मुन्ना बसवंते, माधव भालेराव ,भागवतजी गोरे ,सुभाष वाघमारे आदीसह समाज बांधव उपस्थित होते. मान्यवरांना व नगरातील नागरीकांना रोगप्रतिकार शक्ती वाढवणा-या औषधाचे वाटप केले. कु.शिवानी नवघरे ,प्रगती गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश देवकते यांनी केले.