साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना १११ चारोळ्यांच्या माध्यमातून शब्द – सुमनांजली,शब्द अभिवादन.
धर्मापूरी ( प्रतिनिधी )
लोकशाहीर,साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जन्म शताब्दी वर्षात म्हणजे आँगष्ट २०१९ ते आँगष्ट २०२० दरम्यान सबंध वर्षभर आपल्यातील चोखंदळ वाचक जिवंत ठेवून, अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावरील साहित्य वाचत – वाचत प्रा भगवान किशनराव आमलापुरे यांनी १११ चारोळ्या रचल्या आहेत. आणि जणू एक प्रकारे अण्णा भाऊ साठे यांना शब्द – सुमनांजली, शब्द – अभिवादन केले आहे. या वर्षभरात त्यांनी वर्तमानपत्रात प्रकाशित झालेलें अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावरील विविध लेख,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा कंधारेचे भुमिपूत्र शिवा कांबळे सर लिखित प्रतिभेचा हिमालय : अण्णा भाऊ साठे, भोकरचे साहित्यिक तथा प्रकाशक घंटेवाड यांचे पुस्तक, सुनील शिवाजीराव बेरळीकर या वर्गमित्रांने दिलेले दोन छोट्या पुस्तीका, स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड संपादित आणि प्रकाशित जनवादी साहित्यिक अण्णा भाऊ साठे हा ग्रंथ, उपेक्षितांचा बुलंद आवाज : अण्णा भाऊ साठे, प्रा ज्ञानेश्वर गायकवाड, कुरूळेकर यांचे चिंतन, बी.सी.सोमवंशी लिखित महाराष्ट्रातील मांग ,प्राचार्य तुकाराम हरगिले सरनी दिलेले अण्णा भाऊ साठे यांच्या जीवन आणि कार्यवर आधारित पुस्तकआणि last but not least, युगसाक्षी परिवाराचे आधारवड, त्यांचे कविमित्र डॉ माधवराव कुद्रे यांनी सस्नेह भेट दिलेली स्मरणिका इत्यादि साहित्य वाचताना त्यांना या चारोळ्या सुचल्या आहेत. पुढे या चारोळ्या समीक्षकांकडून तपासून घेऊन, त्यात आवश्यक त्या सुधारणा करून प्रकाशित करण्याचा मनोदय प्रा भगवान आमलापुरे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलून दाखविला.
१)तुक्याला शाळेत घाला मुंबईवरून हा संदेश वारंवार आला.पण योगायोगाचा होता वेगळाच डावतिथे काय करील राव. ( अण्णा भाऊ साठे.).२) क्रांती पिता,गुरु लहुजी साळवे,यांनी केले परावृत्त.म्हणून, पत्रं लिहिले अनाव्रत ,अण्णा भाऊनी.३)अण्णा भाऊ बाळादिड दिवसाची शाळा.पण लागला पुन:लळाअन् फुलला अक्षरमळा.४)अक्षर वांड:मयाचे दानसाहित्य सम्राट हा बहुमानस्विकारला आनंदानेस्वीकारला आनंदाने.अण्णा भाऊ साठे यांनी.५) अण्णा भाऊंचे जन्म शताब्दी वर्षझाला आहे मनोमन हर्ष.करतोय वाचनकाढतोय टाचन.६) दु:ख पचवून गटागटविस्तारीला साहित्य पट,टाळून पाटील – पांडेप्रकाशात आणले बहुजनांचे तांडे.अण्णा भाऊ साठे यांनी.७)व्यक्तीमत्व बहुआयामीतरीही स्वभाव संयमी,म्हणून ,अण्णा भाऊंची लेखणीआहे लाखात देखणी.#(प्रा भगवान किशनराव आमलापुरे)